The BJP will answer only the Javanese farmers on the dam; Minister Satej Patil 
कोल्हापूर

भाजपवाल्यांनो बांधावर जावाच  शेतकरीच उत्तर देतील ; मंत्री सतेज पाटील 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भाजपवाल्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावेच, तेथे त्यांना शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात योग्य उत्तर देतील, असा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी कॉंग्रेसच्या ट्रॅक्‍टर रॅलीच्या निमित्ताने दिला. रॅलीवेळी प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते. 
दसरा चौक येथे झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी घणाघाती भाषण केले. 
मंत्री पाटील म्हणाले, ""शेतकरी कायद्याच्या विरोधात लोक तसेच शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. किमान केंद्र सरकारने कायदे मागे घेण्यासंबंधी तरी जागे व्हावे. भाजपवाले शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत, अशी विचारणा केल्यानंतर मंत्री पाटील यांनी भाजपवाल्यांनी बांधावर जावेच. त्यांच्या पिकाला किमान आधारभूत किंमत मिळणार नाही. एकदा माल विकला गेला त्याचे पैसे मिळणार की नाही हे ही समजून सांगावे, त्याचवेळी शेतकरी त्यांना बरोबर उत्तर देतील.'' 
ते म्हणाले, ""हा कायदा गुपचूप का केला? जाहिराती देऊन तो शेतकऱ्यांचा हिताचा हा कायदा कसा आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही. हा कायदा शेतकऱ्यांचा गळा घोटणारा आहे. इचलकरंजी व्यापारी सूत घेऊन गेल्यानंतर हातमागचालकाची जशी अवस्था तशीच शेतकऱ्यांचीही होईल. माल घेऊन शेतकरी काही गुजरातला जाणार आहेत का? कंत्राटी शेतीच्या माध्यमातून अदानी, अंबानी अशा उद्योगपतींना जमिनी देण्याचा घाट आहे. आपण जागे नाही झालो तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही.'' 


जिताने की जिम्मेदारी मेरी 
पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघापैकी कोणताही एक मतदारसंघ आपल्याकडे घ्या, पक्ष जो उमेदवार देईल, त्यास निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना दिली. दोन्ही मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली आहे. एखादा उमेदवार निवडून गेल्यास विधान परिषदेतील कॉंग्रेसचे संख्याबळ वाढेल, त्यामुळे कोणताही एक मतदारसंघ कॉंग्रेसकडे घ्या, असेही पाटील यांनी नमूद केले.'' हिंदीतून भाषण करताना पाटील यांनी "जिताने की जिम्मेदारी मैं लेता हू' अशी ग्वाही दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT