"Both of those athletes are now on the rugby field 
कोल्हापूर

"त्या' दोघी ऍथलेटिक्‍सनंतर  आता रग्बीच्या मैदानावर 

सुयोग घाटगे

कोल्हापूर  : अंगी कौशल्य आणि दृढ निश्‍चय असेल तर कोणत्याही वेळी कोणत्याही खेळात प्रावीण्य मिळवता येते, आणि हेच केले आहे, पूनम गोविंद पाटील आणि सायली सतीश पाटील या मैत्रिणींनी, ऍथलेटिक्‍समध्ये राज्यस्पर्धा गाजवल्यानंतर रग्बीच्या मैदानावर त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. 
घरची परिस्थिती हलाकीची, दोघीही सामान्य कुटुंबातील, एकीचे वडील चहाची गाडी चालवतात तर दुसरीचे वडील दुचाकीचे गॅरेज. 
अशा परिस्थितीत मुलींसाठी शक्‍य ते प्रयत्न करत त्यांनी खेळातील करिअरला प्राधान्य दिले. शाहू छत्रपती विद्यानिकेतन आणि निवासी क्रीडा प्रशालेने त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास केला. या प्रशालेत त्यांनी ऍथलेटिक्‍सचे धडे गिरवले. या दरम्यान झालेल्या जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय स्पर्धांत चुणूक दाखवत विजय प्राप्त केला. 1 बाय 400 मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत वेगळी ओळख निर्माण केली. प्रशालेतील शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर खेळात नवीन वाट शोधताना त्यांनी रग्बीचा आधार शोधला आहे. जिल्ह्यातील रग्बीने देशात नाव कमावले आहे. विद्यापीठस्तरीय खेलो इंडिया स्पर्धांत कोल्हापूरच्या रग्बी संघाने जेतेपद पटकावले आहे. याशिवाय अनेक राष्ट्रीय स्पर्धांत जिल्हा संघ विजय ठरला आहे. रग्बीचा जिल्ह्यातील संधीही विचार करत पूनम आणि सायली यांनी हा खेळ निवडला आहे. धावण्यासाठीचे विशेष कौशल्य प्राप्त असणाऱ्या या दोन्ही मैत्रिणींना सध्या रग्बीसाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. येत्या हंगामामधील स्पर्धांसाठी त्या तयारी करत असून राज्य आणि राष्ट्रीय संघातील दावेदारी निश्‍चित करण्यास सज्ज होत आहेत. 

क्रीडा प्रशालेतील प्रशिक्षणामुळे खेळातील बारकावे लक्षात आले. मात्र करिअरसाठी खेळ निवडणे महत्त्वाचे होते, त्यासाठी म्हणून रग्बी खेळाची निवड केली. 
- पूनम पाटील

अन्य खेळांच्या तुलनेत हा खेळ कमी खर्चिक आहे. धावण्याचा सराव आधीपासूनच असल्याचा फायदा या खेळात होत आहे. वेग आणि नियंत्रण असे दोन्हीच्या संयोगाने खेळावा लागणाऱ्या या खेळात प्रावीण्य मिळवत आहे. 
- सायली पाटील.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT