Boycott on Chinese goods campaign started from Kolhapur 
कोल्हापूर

चिनी वस्तूंवर बहिष्कार, देशव्यापी अभियानाला कोल्हापुरातून सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) नवी दिल्ली यांच्या 'भारतीय सामान, हमारा अभिमान' आणि चीनी वस्तूंवर बहिष्कार या देशव्यापी अभियानाची सुरवात कोल्हापुरात झाली. आमदार चंद्रकांत जाधव, "सीएआयटी'चे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, संघटन सचिव ललित गांधी, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाला. 

"चेंबर'चे माजी अध्यक्ष आनंद माने, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी कोल्हापुरातील हॉटेलमधील मेनूकार्डामध्ये चायनीज पदार्थाचे नाव असणार नाही. कोणत्याही हॉटेलमध्ये चायनीज पदार्थ तयार केले जाणार नाही. विकले जाणार नाही, असा निर्धार केला. हॉटेलमधील मेनूकार्ड जाळले. "क्रिडाई'चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी बांधकाम क्षेत्रात चायनीज वस्तुची आयात करणार नाही. वापरणार नाही, असे जाहीर केले. प्लायवुड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी चीनवरून येणारा कोणताही प्लायवुड माल आयात करणार नाही. विकणार नाही, असे सांगितले. जिल्हा फुटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी कोल्हापुरी चप्पलची जास्त मागणी कशी राहील यासाठी प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरमध्ये कोणत्याही चप्पल विक्रत्याकडून चायनीज चप्पल विकले जाणार नाही, असे सांगितले. 

सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी कोणत्याही सराफाकडून चायनीज पर्ल्स, मोती, हिरे यांची विक्री केली जाणार नाही, असे सांगिले. स्टोन ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय दुग्गे यांनी चायनीज टाईल्स, मार्बल आदी फरशा विकल्या जाणार नाही. आय.टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष शांताराम सुर्वे यांनी आय.टी.मध्ये कोणत्याही प्रकारच्या चायनिज वस्तू वापरल्या जाणार नाहीत. चायनीज कंपनीचे काम करणार नाही. असे सांगितले. दि कन्झ्युमर्स प्रॉडक्‍टस्‌ डिस्ट्रीब्युटर्स वेलफेअर असोसिएशनरचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी कन्झ्युमर्स प्रॉडक्‍टस्‌ डिस्ट्रीब्युटर्सतर्फे कोणत्याही प्रकारचा चायनिज माल आयात केला जाणार नाही. विकला जाणार नाही. किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडीया यांनी कोणत्याही किराणा दुकानात येथून पुढे चायनीज माल विकला जाणार नाही. इलेक्‍ट्रीकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी यांनी इलेक्‍ट्रीकल दुकानात समारंभ किंवा सणासुदीला लागणाऱ्या सजावटीच्या चायनीज इलेक्‍ट्रीकल वस्तू येथून पुढे विक्रीसाठी ठेवल्या जाणार नाहीत. 

रेडिओ इलेक्‍ट्रॉनिक्‍स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल धडाम यांनी इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या कोणत्याही प्रकारच्या चायनिज वस्तू विकल्या जाणार नाहीत. दुरूस्त केल्या जाणार नाहीत. टॉईज बॅग्ज व कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतभाई गोयानी यांनी कोणत्याही टॉईज बॅग्ज आणि कटलरी दुकानात चायनीज खेळणी, बॅग्ज, कटलरी साहित्य विक्री केले जाणार नाही. कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील यांनी कोणत्याही कापड दुकानात चायनिज कापड विक्रीसाठी ठेवले जाणार नाही. ग्रेन मर्चंटस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष अभयकुमार अथणे यांनी ग्रेन मर्चंटस्‌ असोसिएशनच्या कोणत्याही सदस्यांकडून चायनीज वस्तू विक्री केल्या जाणार नाही, असे सांगितले. 

चीनी मालाची पाच लाख कोटी होणारी वार्षीक आयात डिसेंबरपर्यंत एक लाख कोटी आयात कमी करणे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी "चेंबर'तर्फे ग्राहक वर्गात प्रबोधन करण्यासाठी अशा आशयाची पोस्टर्स शहरात लावली जाणार आहेत. व्यापाऱ्यांनी चीनी मालाची खरेदी करू नये. ग्राहकांनी चीनी वस्तूंचा आग्रह करू नये, असे "चेंबर'चे अध्यक्ष श्री. शेटे यांनी सांगितले. "चेंबर'चे सचिव वैभव सावर्डेकर, राजू पाटील, संचालक राहूल नष्टे, संचालक तौफिक मुल्लाणी, प्रकाश केसरकर, धनाजी पाटील, महेश धर्माधिकारी, उदयसिंह निंबाळकर, विनोद डुणुंग, शिवानंद पिसे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT