boys murder in kolhapur ichalkaranji kolhapur crime news 
कोल्हापूर

ब्रेकिंग - इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : शहापूर येथे शाळेच्या मैदानावर धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. शुभम दिपक कुडाळकर (रा. मंगळवार पेठ, वय २६) असे खून युवकाचे नाव असल्याचे समजते.

 गॅंगवारमधून हा खून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. शहापूर भरवस्तीत हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी शहापूर पोलिस दाखल झाले आहेत. 

मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास विशाल विद्यालयाच्या मैदानात जवळील मार्गावरून एक व्यक्ती आपल्या घरातील रुग्णाला जेवणाचा डबा देण्यासाठी जात होती. या व्यक्तीला गाडीच्या प्रकाशासमोर  एक रक्तबंबाळ झालेला तरुण पडलेला दिसून आला. त्यानंतर या व्यक्तीने त्वरित पोलिसांना ही माहिती   कळवली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

इचलकरंजी शहरांत खुनी हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. चार दिवसापूर्वी एका युवकाची धारदार शस्त्राने केली होती. त्यापाठोपाठ आज शहापूरमध्ये एका युवकाची हत्या झाली आहे. पाठोपाठ दोन खूनाच्या घटाना घडल्यामुळे शहर हादरले आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT