bridle attend suicide in aastha kolhapur 
कोल्हापूर

‘तुझ्या सासरच्यांना समजावून सांगतो’ म्हणणाऱ्या आईबापाला कल्पनाच नव्हती तिच्या शेवटच्या फोनची, अनुजाने मात्र संपवली जीवनयात्रा

सकाळ वृत्तसेवा

आष्टा (कोल्हापूर) : येथील दुधगाव रस्त्यावरील अनुजा अवधूत माळी (वय २३) या नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ही आत्महत्या नसून, पती, सासू-सासऱ्यांनी घातपात केल्याच्या आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबत अनुजाचे वडील सुकुमार दत्तात्रेय पाटील (कांडगाव, गोठ्या माळ, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी अनुजाचे पती अवधूत संजय माळी, सासरे संजय बापू माळी, सासू वंदना संजय माळी यांच्याविरोधात आष्टा पोलिसांत फिर्याद दिली.

दरम्यान, सासू-सासऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या नातेवाइकांनी नकार दिल्याने रात्री उशिरा अनुजाचे पती, सासू-सासरे या  तिघांना अटक करण्यात आली आहे. आष्टा पोलिसांत सुकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलगी अनुजा अवधूत माळी (वय २३) हिचा अवधूत माळी (दुधगाव रोड, आष्टा) याच्याशी २२ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला. विवाह झाल्यापासून ती सासरीच राहत होती. १३ जानेवारी रोजी ती संक्रांतीला माहेरी आली. त्यावेळी तिने पती व सासरचे लोक मारहाण करतात, मानपान केला नाही म्हणून टोचून बोलतात, असे सांगितले होते. ‘तुझ्या सासरच्यांना समजावून सांगतो’ असे आम्ही सांगितले.

१८ रोजी पती, सासू, सासरे, चुलत दीर, चुलत जाऊ कांडगावला तिला नेण्यात आले. त्यांना समजावून मानपान करून अनुजाला सासरी पाठवले. आम्ही, तसेच मेहुणे नारायण पांडुरंग चौगुले (अडूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) खुशाली विचारण्यास दूरध्वनी करत होतो. १९ रोजी रात्री नारायण चौगुले यांनी अनुजाला दूरध्वनी केला. पती रागवल्याचा, ओरडल्याचा आवाज आला. नवरा अवधूत मारहाण करीत असल्याबाबत मुलगी सांगत होती.

आज सकाळी सासरे संजय माळी यांनी दूरध्वनी करून कळवले, की अनुजाने गळफास लावून घेतला. तुम्ही या. आष्टा येथे गेलो असता तिचा मृतदेह खाली उतरून ठेवला होता. अनुजाने पती, सासरे, सासू वंदना यांच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केली आहे, असेही त्यांनी फिर्यादित म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटकही केली आहे.

ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी

अनुजाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. सासू-सासऱ्यांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी पंचनामा केला. तहसीलदारांनी पंचनामा केला. सायंकाळी नातेवाइकांचा पवित्रा पाहून पोलिसांनी पती, सासू, सासऱ्यांना अटक केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Majalgaon Dam: माजलगाव धरणाचे दहा दरवाजे उघडले; ३१ हजार क्युसेक विसर्गाने सांडस चिंचोलीचा संपर्क तुटला, सिंदफणा’ दुथडी भरुन

Latest Marathi News Updates : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

Heavy Rain Precautions: राज्यात परतीच्या पावसाची तुफान बॅटिंग, नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी? वाचा एका क्लिकवर

IND vs PAK : पाकिस्तानला अपमानाचा आलाय राग! भारताविरुद्ध केली तक्रार, मॅच रेफरीवर काढला राग; काय होऊ शकते कारवाई?

Solapur Rain update:'साेलापूरतील पुलावरून वाहून गेला रिक्षाचालक'; पूना नाका पुलाजवळ दोन्हीकडे नव्हते बॅरिकेट, रिक्षा पाण्याजवळ उभी

SCROLL FOR NEXT