British-era Bridge Shiroli on Panchganga River esakal
कोल्हापूर

Panchganga River : पंचगंगा नदीवरील 133 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा; काय आहे कारण?

शिरोली येथील १३३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ब्रिटिशकालीन लोखंडी पूल आता इतिहासजमा होणार आहे.

अभिजित कुलकर्णी

शंभर वर्षे कोल्हापूरकरांना सेवा दिल्यानंतर तीस वर्षांपूर्वी या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती.

नागाव : पंचगंगा नदीवरील पुलाची शिरोली येथील १३३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ब्रिटिशकालीन लोखंडी पूल आता इतिहासजमा होणार आहे. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणामध्ये हा पूल उतरवण्यात येणार असून, या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

लंडनमधील वेस्टवूड बॅली अॅण्ड कंपनीने १८९० पूर्वी हा पूल उभा केला आहे. या पुलाच्या उभारणीनंतरच शिरोली गावाला पुलाची शिरोली अशी नवीन ओळख मिळत गेली. ब्रिटिश राजवटीत करवीर संस्थानमध्ये १८७० च्या दशकात काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार होते.

वस्तू, माल आणि यंत्रसामग्री यांची नदी पात्रावरील वाहतूक सोयीची व्हावी, यासाठी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लंडन येथील प्रसिद्ध वेस्टवूड बॅली अॅण्ड कंपनीला पूल उभारण्याचे काॅन्ट्रॅक्ट दिले. नदीपात्रात सात दगडी पिलर बांधून त्यावर लोखंडी स्ट्रक्चर तयार केले.

पुलाची वाहतूक क्षमता आणि किती वर्षांसाठीचा वापर हे निश्चित करुनच त्याची उभारणी झाली. त्यामुळे सुमारे दीड ते दोन हजार मेट्रिक टन लोखंड या पुलासाठी वापरण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. पुलाच्या पश्चिमेस असणाऱ्या लोखंडी गार्डवर वेस्टवूड बॅली अॅण्ड कंपनी, इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर पोपलार लंडन याच्या खुणा आजही जशाच्या तशा आहेत.

शंभर वर्षे कोल्हापूरकरांना सेवा दिल्यानंतर तीस वर्षांपूर्वी या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्याही अगोदर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमध्ये या लोखंडी पुलाच्या पूर्वेस नवा पूल बांधण्यात आला. त्यामुळे लोखंडी पुलावरील वाहतूक आपोआप कमी झाली होती. पण १९९० च्या दशकात या पुलावरून दुचाकी व तीनचाकी हलकी वाहने रहदारी करत होती.

२००४ नंतर वाहतूक पूर्णत: बंद

महामार्गाच्या चौपदरीकरणात २००४ मध्ये पंचगंगा नदीवर आणखीन एक पूल बांधण्यात आला आणि लोखंडी पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी कोल्हापूर शहराच्या प्रवेशासाठी बास्केट ब्रीज मंजूर आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक पूल होणार आहेत. परिणामी हा लोखंडी पूल उतरवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT