burning car in kolhapur 
कोल्हापूर

video - वेळ आली होती पण काळ नाही!... कारने अचानक पेट घेतला पण...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गारगोटीहून कोल्हापूरकडे येत असलेल्या एका आलिशान चारचाकीने इस्पुर्ली (ता. करवीर) येथील घाटात रस्त्याकडेला असलेल्या डाव्या बाजूच्या चरीत गेल्याने पेट घेतला. यामध्ये साने गुरुजी वसाहतीतील महिला चालकासह तिचा मुलगा बचावला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पेटलेली चारचाकी विझवून पुढील अनर्थ टाळला. ही घटना आज (रविवारी) रात्री अकराच्या सुमारास घडली. 

इस्पुर्ली घाटात चारचाकीचा ताबा सुटून रस्त्याच्या डाव्या बाजूला अपघात होऊन पेट घेतला. घटनास्थळी अग्निशमन दलाने तत्काळ जाऊन आग विझवली. साने गुरुजी वसाहतीतील एका अपार्टमेंटमधील रहिवाशी असणारी ही महिला आपल्या मुलासह रात्री उशिरा गारगोटीहून कोल्हापूरला येत होती. इस्पुर्ली येथे आल्यानंतर अचानक चारचाकी डाव्या बाजूला ओढली गेली आणि रस्त्याच्याकडेला असणाऱ्या चरीत घुसली व पेट घेतला. दरम्यान, अग्निशमन दलाचा चालक सुनील वाईंगडे, फायरमन गिरीष गवळी, संग्राम मोरे व श्रीधर चाचे या जवानांनी आग आटोक्‍यात आणली. 

<

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT