Businessman Santosh Shinde Case esakal
कोल्हापूर

Santosh Shinde Case : पोलिसांनी संशयित माजी नगरसेविकेसह राऊतांच्या घराची घेतली झडती; आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण!

पोलिसांनी माजी नगरसेविकेच्या गडहिंग्लज येथील घराची तर राऊत याच्या निलजी (ता. गडहिंग्लज) येथील घराची झडती घेतली.

सकाळ डिजिटल टीम

'आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक राहुल राऊत याला त्वरित निलंबित करावे.'

गडहिंग्लज : येथील उद्योजक संतोष शिंदे आत्महत्येप्रकरणी (Santosh Shinde Suicide Case) संशयित माजी नगरसेविका व सहायक पोलिस निरीक्षक राहुल राऊत यांना पोलिसांनी तपासासाठी फिरवले. माजी नगरसेविकेच्या गडहिंग्लज येथील घराची तर राऊत याच्या निलजी (ता. गडहिंग्लज) येथील घराची झडती घेतली.

तसेच संशयितांच्या बँक खात्यांचा तपशील मागविला असल्याचे समजते. येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांच्यासह आत्महत्या केली आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील माजी नगरसेविका व राहुल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी त्यांना विजापूर येथून अटक केली. सोमवारी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून काल दोघाही संशयितांच्या घरांची झडती घेतली.

दुपारी बाराच्या सुमारास माजी नगरसेविकेला तिच्या आजरा मार्गावरील घरात आणले. यावेळी घराजवळ पोलिस बंदोबस्त होता. पोलिसांनी घराची झडती घेतली. तर राहुल राऊत याला सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिस निलजी (ता. गडहिंग्लज) येथील त्याच्या घरी घेऊन गेले होते. त्याच्याही घराची तपासणी केली.

पण, फारसे काही हाताला लागले नाही. मयत संतोष शिंदे यांच्याकडे संशयित माजी नगरसेविका व राहुल राऊत यांनी एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे दोघाही संशयितांच्या बँक खात्यांचा तपशील पोलिसांनी मागविला असल्याचे समजते.

शिवसेनेचे जिल्हा पोलिसप्रमुखांना निवेदन

आत्महत्येप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडीत यांची भेट घेतली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक राहुल राऊत याला त्वरित निलंबित करावे. तसेच माजी नगरसेविकेच्या पतीच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT