Gadhinglaj Case esakal
कोल्हापूर

Gadhinglaj : नेहमी आजीजवळ झोपणाऱ्या अर्जूनला 'त्या' रात्री वडिलांनी बोलावून नेलं अन् रक्ताच्या थारोळ्यात..

उद्योजक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जूनसह आत्महत्या केली.

सकाळ डिजिटल टीम

रक्ताच्या थारोळ्यात तिघांचेही मृतदेह पाहून तो घाबरुन गेला.

गडहिंग्लज : येथील तरुण आणि मनमिळावू उद्योजक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जूनसह आत्महत्या केली. या घटनेत सापडलेल्या चिठ्ठीमध्ये एक महिला व तिच्या साथीदाराचे नाव असल्याचे कळताच संतोष यांचे मित्रमंडळी आणि नागरिक संतप्त झाले.

त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातून फेरी मारुन गडहिंग्लज बंदचे आवाहन केले. त्याला व्यावसायिक, उद्योजकांचा प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, आजोबांचे निधन झाल्यापासून रोज आजीजवळच झोपण्यासाठी असणाऱ्या १५ वर्षीय अर्जूनला शुक्रवारी (ता. २३) रात्री सोबत घेवून झोपायला आई-वडिलांनी वरच्या मजल्यावरील खोलीत नेलं आणि आज सकाळी आई-वडिलांसह अर्जूनही रक्ताच्या थारोळ्यात दिसताच निर्माण झालेली भयाण शांतता नागरिकांची काळीज चिरणारी ठरली.

अर्जून हा यावर्षी दहावीत शिकत होता. शिंदे दाम्पत्याला तो एकुलता मुलगा होता. यामुळे आजी-आजोबाची त्यावर दांडगी माया. आजी त्याला लाडाने ’चिक्कू’ नावाने हाक मारायची. आजोबा वसंत शिंदे यांचे काही महिन्यापूर्वीच निधन झाले. त्यानंतर आजी एकटी झाल्याने अर्जून तेंव्हापासून तिच्याजवळच झोपायचा.

नेमके शुक्रवारीच त्याला झोपण्यासाठी आमच्या सोबत घेवून जात असल्याचे संतोष व पत्नीने त्याच्या आजीला सांगितले. आजी तयार झाली. अर्जूनची आजीजवळ झोपण्याची इच्छा होती. तरीही तो त्या दिवशी आई-वडिलांसोबत झोपण्यासाठी वरच्या खोलीत गेला. सकाळी त्यांना उठवण्यासाठी गेलेल्या शुभमला ही घटना पाहून काय करायचे सुचेना.

रक्ताच्या थारोळ्यात तिघांचेही मृतदेह पाहून तो घाबरुन गेला. सोबत झोपण्यासाठी कधीच अर्जूनला आग्रह न करणार्‍या संतोष व पत्नी तेजस्विनी यांनी नेमके घटनेच्या दिवशीच रात्री त्याला घेवून गेल्याने त्यांनी आधीपासूनच आत्महत्येची मानसिकता तयार केली असावी का, अशी चर्चा या घटनेनंतर नातेवाईक व नागरिकांत सुरु होती. या घटनेने उपस्थित नागरिकांतून हळहळ व्यक्त होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT