Career opportunities in the industrial sector 
कोल्हापूर

लाॅकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पण 'या' क्षेत्रात आहे करिअरची मोठी संधी

रमेश पाटील

म्हाकवे (कोल्हापूर) : औद्योगिक क्षेत्रात वेल्डर कामासाठी कामगारांची कमतरता आहे. तर जिल्ह्यातील खाजगी, शासकीय आयटीआयमध्ये  वेल्डर या अभ्यासक्रमाठी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. कमी वेळेत आणि खर्चात हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. तसेच स्वतःच्या व्यवसायाबरोबरच चांगल्या पगाराची नोकरी देणाऱ्या या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा पाठ फिरवली आहे.


औद्योगिक क्षेत्रातील  परप्रांतीय कामगारदेखील कोरानाच्या भितीमुळे आपल्या मुळ गावी गेले आहेत. त्यामुळे वेल्डरांचा तुटवडा आहे. वेल्डींग क्षेत्रात रोजगारांची संधी व नोकरीची हमी असल्याने स्थानिक तरुणांनी या अभ्यासक्रमाकडे वळणे गरजेचे अल्याचे तज्ञांचे मत आहे. 

जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल पंचतारांकित या ठिकाणी औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात विस्तारीत झाल्या आहेत. येथील सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के कारखाने फॅब्रीकेशनचा वापर करुन बांधलेले आहेत. तसेच अनेक  कारखान्यात विविध प्रकारच्या वेल्डींगची कामे  आहेत. यामध्ये शेती औजारे, फौंन्ड्री भट्टी, टँक, इरिगेशन पाईपींग, वैरण व ऊस वाहतूक बैलगाडी, लोखंडी कैच्या, दवाखाना आणि हॉटेलमधील बेड, टेबल, फर्निचर, किचन ट्रॉलीज, खवा मशीन कापणी व मळणी यंत्रे, ग्रील्स, गेट, कैची, रुपींग, हॉस्पिटलमध्ये लागणारे फर्निचर आशी कामे करण्यासह अन्य कामासाठी वेल्डर कामगार आवश्यक असतात. या कामगारांना चांगला पगार दिला जातो. मात्र वेल्डरांची संख्या फार कमी आहे. 


वेल्डींग क्षेत्रातही नवनवीन अत्याधुनिक साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये हेल्मेट, गॉगल, काचा, शूज, मशिनरी, रॉड यासह अन्य साहित्यांचा समावेश आहे. आत्याधुनिक साहित्यामुळे अपघातांचे प्रमाण अंत्यल्प आहे. तरीही सध्या या क्षेत्रात काम करणाऱ्या वेल्डर कामगारांची मोठ्या प्रमाणात  कमतरता औद्योगिक वसाहतीमध्ये भासत आहे. 


जिल्ह्यात खासगी चाळीस आणि शासकीय बारा आयटीआय आहेत. यापैकी खासगी चौदा, शासकीय नऊ आयटीआयमध्ये वेल्डर ट्रेडच्या जागा आहेत. जिल्ह्यात खाजगी आयटीआय मध्ये ५०० तर शासकीय आयटीआयमध्ये ३६० जागा अशा एकूण ८६० जागा वेल्डरसाठी आरक्षित आहेत. खाजगी आयटीआय मधील पाचशे जागांपैकी १८८ विद्यार्थ्यांनीच विकल्प भरले आहेत.  विकल्प भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तरीही ८० ते ८५ टक्के जागा रिक्त राहतात.
        


करीअरची संधी

 वेल्डींग क्षेत्रात कामाच्या  मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच नोकरीची हमी आहे. त्याचबरोबर फॅब्रीकेशन कामे ही
 वजनावर (मेट्रीक टन) मिळत असल्याने  उत्पन्नही चांगले मिळते. नवीन मुलांना या क्षेत्रात करिअर संधी आहे.


" जिल्ह्यात शासकिय आणि खाजगी आयटीआयची संख्या ५२ आहे. यापैकी वेल्डर कोर्स असलेल्या संस्थेत फक्त वीस टक्के मुलांनी वेल्डर कोर्स प्रवेशासाठी विकल्प निवडल्याचे दिसून येत आहे. हा कोर्स कमी वेळेत व कमी खर्चात पूर्ण करता येतो. त्यामुळे नोकरीची संधी लवकर उपलब्ध होते. तसेच स्वतःचा उद्योगही सुरु करता येतो."
 -अमोल वास्कर, प्राचार्य, आयटीआय हमिदवाडा.

" जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक वेल्डरांची कमतरता आहे. तसेच या क्षेत्रात तरुणांना अनेक संधी उपलब्ध आहेत.  चांगले करिअर करता येते.  स्वतःच्या व्यवसायाबरोबरच चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत."

- गोरख माळी, मॕक अध्यक्ष, फाईव्हस्टार कागल.


 संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jay Pawar: ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत; जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क, सूचक वक्तव्य करत जय पवारांची मोठी मागणी

Google Investment : गुगल भारतात १.३५ लाख कोटींची गुंतवणूक करणार ; अमेरिकेपर्यंत समुद्राखाली केबल टाकणार

Property Tax : मिळकतकरात वाढीचा प्रस्ताव फेटाळला; नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT