case registered against corona infected women husband brother and driver in belgum
case registered against corona infected women husband brother and driver in belgum 
कोल्हापूर

'त्या' महिलेचा पती, भाऊ व चालक अडचणीत ; बेळगाव पोलिसात गुन्हा नोंदविणार...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेळगावातील सदाशिवनगर येथे सापडलेल्या कोरोनाग्रस्त महिलेचा पती, भाऊ व चालक या तिघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी महापालिका आयुक्त के एच जगदीश याना तसा आदेश बजावला आहे. आयुक्त जगदीश यांनी पालिकेच्या प्रशासन विभागाला पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली आहे. प्रशासन उपयुक्तांकडून तक्रार दिली जाण्याची शक्यता आहे. पालिकेच्या प्रशासन विभागाने याला दुजोरा दिला आहे. कर्नाटक सरकार किंवा बेळगाव जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता त्या महिलेने राज्यात प्रवेश केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सदाशिवनगर येथील या कोरोना बाधित महिलेची सविस्तर माहिती महापालिकेने घेतली आहे. सदर महिला २७ वर्षे वयाची असून ती गरोदर आहे. ती आपल्या पतीसह मुंबईत धारावी येथील मुख्य रस्त्यावरील निवासस्थानात वास्तव्यास होती. गरोदर असल्याने प्रसूतीसाठी माहेरी म्हणजे बेळगाव येथे जाण्याचा निर्णय त्या महिलेने घेतला. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी घेतली. पण कर्नाटकात म्हणजे बेळगावात जाण्यासाठी परवानगी घेतली नाही.

५ मे रोजी सदर महिला बेळगावात आली. खासगी वाहन घेऊन ती महिला आली. एडविन थॉमस नावाचा चालक त्या महिलेला घेऊन बेळगावात आला. तो मूळचा मुंबई येथील धारावीचा आहे. पण ती महिला व चालक कर्नाटकात प्रवेश करताना त्यांना कोगनोळी येथे का अडविले नाही असा प्रश्न आता उद्भवला आहे. त्या महिलेला सोडून चालक परत मुंबई येथे गेला आहे. आता महिला कोरोनाबाधित झाल्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. विनापरवाना राज्यात प्रवेश केल्याबद्दल त्या महिलेचा पती, चालक एडविन व भाऊ अंकित यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला जाणार आहे. भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान या महिलेची गर्भवती वहिनी तिच्या संपर्कात आली आहे. ती वहिनी दोन महिन्याची गर्भवती असून खबरदारी म्हणून तिलाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याशिवाय महिलेचे आई व वडील, भाऊ, मोलकरीण, तिची मुलगी व चार नातवंडे आशा दहा जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सदर महिलेचे सदाशिवनगर येथील ज्या घरात वास्तव्य होते त्या घराच्या जवळील चार घरांमधील मिळून १२ जणांना होम क्वारणटाईन करण्यात आल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT