Caution; Think before you buy a credit card ... 
कोल्हापूर

सावधान; क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी विचार करा...

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : "डोअर टू डोअर' येऊन दिले जाणारे क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी विचार करा, फसवणूक होऊ शकते. मोफत दिल्या जाणाऱ्या कार्डने काही महिन्यांनंतर सुमारे साडेतीन हजार रुपयांचा चुना लागू शकतो. एका फायनान्स कंपनीचा एका बॅंकेशी संयुक्त करार झाल्याचे सांगितले जाते. त्यांचे प्रतिनिधी दारात येऊन क्रेडिट कार्ड देतात. सुरवातीला मोफत असल्याचे सांगण्यात येते; मात्र काही दिवसांनी नोंदणी शुल्क म्हणून साडेतीन हजार भरण्याचा तगादा लावला जातो. 

कधी महिला दिन म्हणून, तर कधी इतर काही निमित्ताने विक्रेते तुमच्या दारात येतील. क्रेडिट कार्ड कसे उपयोगी येईल, हे पटवून कार्ड गळ्यात मारतील. यावेळी केवळ सह्या करा, आम्ही फॉर्म भरतो म्हणून सांगितले जाते. तातडीने सह्या केल्या जातात. हातात क्रेडिट कार्ड ठेवले जाते आणि ते निघून जातात आणि तेथेच त्यांची फसवणूक होते. 

एका शिक्षकाला आलेला अनुभव असाच काही आहे. त्यांच्या दारात दोघे गेले. त्यांना क्रेडिट कार्डचे महत्त्व पटवून सांगितले. आजारी पडलात तर तातडीने उपयोग होऊ शकतो. परगावी गेल्यावर पैसे पाहिजे असल्यास त्याचा उपयोग होतो. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत जा, असे सांगितले. त्यांच्या मधाळ वाणीने गरज नसताना शिक्षकांनी क्रेडिट कार्ड घेतले. माहिती न वाचता सह्या केल्या आणि ते दोघे कार्ड देऊन गेले. त्यांनी ते वापरले नाही. 

पैसे भरावेच लागणार 
तीन महिन्यांनंतर कार्डचे पैसे भरण्याचे एसएमएस शिक्षकास येत आहेत. त्यांनी फायनान्स कंपनीत चौकशी केली तेव्हा त्यांनी ते कार्ड फेकून द्या, असे सांगितले. संबंधित बॅंकेत विचारणा केली असता तुम्हाला नोंदणी शुल्क म्हणून ती रक्कम भरावी लागेल, असे स्पष्ट केले. पैसे नाही भरले, तर एसएमएस येत राहणार आणि खात्यावर येणे दिसणार असल्याचे सांगितले. त्या शिक्षकांचे खाते त्या बॅंकेत नाही तरीही त्यांना भविष्यात कर्ज काढले तरी त्याची वसुली केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT