Chandgad Residents' Agitation In Mumbai Kolhapur Marathi News
Chandgad Residents' Agitation In Mumbai Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

मुंबईत घुमला चंदगडकरांचा आवाज

सुनील कोंडुसकर

चंदगड : मुंबई येथील डिलाईल रोडवर राहणाऱ्या चंदगड तालुक्‍यातील सीमा संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी आज "बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या मागणीसाठी आंदोलन केले. काळया फिती बांधून घोषणा देण्यात आल्या. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. 

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबरला काळा दिवस पाळला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सीमाभागवाशी व मराठी बांधवाकडून काळ्या फिती बांधून घोषणाबाजी करत सीमाभागातील झालेल्या दडपशाहीचा निषेध केला जातो. या सीमाभागच्या लढ्यासाठी अनेकांनी बलिदान, सर्वस्व देऊन हा लढा तेजोमेय ठेवला आहें. त्यामुळे त्यांना श्रध्दांजली म्हणून हुतात्मा दिनही पाळला जातो. बेळगावशी संलग्न चंदगड तालुक्‍यातील अनेक नागरिकांचा या आंदोलनाला पाठींबा आहे. अनेक वर्षापासून ते या लढ्यात सक्रीय सहभागी आहेत. त्याच भूमिकेतुन हे आंदोलन झाले. या वेळी सीमा समन्वय समितीचे सदस्य भरमु नांगनूरकर, पिराजी पाटील, एम.जे.पाटील, प्रदीप चौगुले, लक्ष्मण गावडे, धोंडिबा दळवी, संदीप खवरे, गणेश दस्ते, गणपत गावडे, गंगाराम गावडे, रमेश पाटील, मधुकर पाटील, राणबा देशवळ आदी मराठी बांधव उपस्थित होते. 

चंदगडला कॉंग्रेसकडून कर्नाटकचा निषेध 
दरम्यान, चंदगड तालुक्‍यात कॉंग्रेस कार्यकारिणीतर्फे आज कर्नाटक शासनाचा निषेध करण्यात आला. सीमा भागातील मराठी बांधवांवर या शासनाकडून अनेक वर्षांपासून अत्याचार सुरू आहेत. मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात समावेश करावा, यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून सुरू असलेले आंदोलन अजूनही थांबलेले नाही. बेळगाव, भालकी, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या दडपशाहीचा निषेध केला. या वेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर, जे. बी. पाटील, विक्रम चव्हाण-पाटील, जयसिंग पाटील, उदय देसाई, जयवंत शिंदे, अभिजित गुरबे, राजेंद्र परीट, आनंद हळदणकर, अशोक दाणी, महादेव मंडलिक, महादेव वांद्रे, जनार्दन देसाई, वसंत सुतार, मेहताब नाईक, कलीम मदार, तुकाराम पाटील उपस्थित होते. 

आजऱ्यामध्ये आंदोलन 
एक नोव्हेंबरला सीमाभागात काळा दिन पाळला जातो. या वर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीला कार्यक्रमासाठी कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली. कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात आजऱ्यात शिवसेनेने आंदोलन केले. उपजिल्हा संघटक संभाजी पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी बेळगाव, कारवार, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेत अशा घोषणा देण्यात आल्या. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करून धिक्काराच्या घोषणा दिल्या. तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, उपशहरप्रमुख भिकाजी विभूते, समीर चॉंद, दयानंद भोपळे, रवी यादव, दिनेश कांबळे, शिवसैनिक उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT