kolhapur esakal
कोल्हापूर

फुटबॉल खेळाडूंचा आधारवड

आमदार जाधवांच्या निधनानं फुटबॉल खेळाडूंचा आधारवडच हरपला आहे.

- राजेश मोरे

आमदार जाधवांच्या निधनानं फुटबॉल खेळाडूंचा आधारवडच हरपला आहे.

फुटबॉल म्हणजे पेठापेठांतील ईर्ष्या, राजकारण, विरोध. याच्या पलीकडे जाऊन कोल्हापुरातील प्रत्येक संघ, खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे, त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देणारे, फुटबॉलबरोबरच त्यांच्या हाताला काम देऊन त्यांचे भविष्य उज्‍ज्वल करायचे ही धडपड असलेले एक खेळाडू, आमदार म्हणजे चंद्रकांत जाधव. त्यांच्या निधनाने फुटबॉल खेळाडूंचा आधारवडच हरपला आहे.

आमदार जाधव यांची फुटबॉल खेळाडू म्हणूनही ओळख होती. ते पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम) संघाचे माजी खेळाडू. फुटबॉल हा त्यांचा जीव की प्राण होता. भावी पिढीला मैदानाची गोडी लागावी, यासाठी त्यांची धडपड असायची. खेळाडू स्थानिक असो अगर बाहेरच्या पेठातील असो. तो कोल्हापूरचा अर्थात माझा खेळाडू आहे, तो मोठा झाला पाहिजे. त्याच्या माध्यमातून कोल्हापूरचे नाव उज्‍ज्वल झाले पाहिजे, अशी त्यांची तळमळ असायची. त्यासाठी ते कधी फुटबॉल किट घालून, तर कधी संयोजक म्हणून मैदानात दिसायचे. विविध फुटबॉल स्पर्धेत त्यांनी मोठे बक्षीस देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी २०१८ पासून चंद्रकांत महासंग्राम फुटबॉल चषक स्पर्धा सुरू केली. त्याला तब्बल पाच लाखांपर्यंतचे मोठे बक्षीसही ठेवले होते.

कोल्हापूरचा संघ आयलीगमध्ये असावा, या उद्देशाने आण्णांनी २०१८ मध्ये ‘फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटीची (एफसी)’ स्थापना केली. या माध्यमातून १३, १५ व १८ वर्षे वयोगटातील तीन संघ तयार केले. यात शहर, जिल्ह्यासह राज्यातील खेळाडूंचा समावेश करून यांच्या टॅलेंटला चालना देण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जाधव इंडस्ट्रीजचा संघ तयार केला. यातून महिलांचा वरिष्ठ संघ तयार केला. या संघाने इंडियन वूमन लीग स्पर्धेत दोनवेळा प्रतिनिधित्व केले. आजी माजी खेळाडूंच्या माध्यमातून त्यांनी नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला. अशा आमदारांचे जाणे फुटबॉलप्रेमींच्या मनाला चकटा लावून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT