Chandrakant Patil esakal
कोल्हापूर

Chandrakant Patil : आमच्या 'त्या' चुकीमुळे विधानसभेत अमल महाडिकांचा पराभव झाला; मंत्री चंद्रकांत पाटलांची कबुली

Chandrakant Patil : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालाल तर जीवनात प्रगती होईल. याच विचाराने पोटाची भूक भागून तत्त्‍वज्ञान प्राप्त होईल.'

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यामध्ये २००४ पासून आपण राजकारणात असून, राजकारणापेक्षा समाजकार्याला जास्त महत्त्व दिल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

कोल्हापूर : आमच्या थोड्या चुकीमुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांचा पराभव झाला. मात्र, यावेळी ते नक्की निवडून येतील, असा विश्‍वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला. देशाची राज्यघटना कधीही बदलली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

साळोखे पार्कातील बुद्ध विहाराचे (Salokhe Park Buddha Vihar) लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वास्तूमधून महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण व मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

जिल्ह्यामध्ये २००४ पासून आपण राजकारणात असून, राजकारणापेक्षा समाजकार्याला जास्त महत्त्व दिल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालाल तर जीवनात प्रगती होईल. याच विचाराने पोटाची भूक भागून तत्त्‍वज्ञान प्राप्त होईल. नवीन जीवन पद्धती स्वीकारायच्या असतील तर हिंदू धर्माशी निगडीत धर्म असावा.’

नवीन पिढी संस्कारक्षम करण्यासाठी या बुद्ध विहाराचा वापर व्हावा, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. अनेक वर्षापासून साळोखे पार्क व राजेंद्रनगर येथील नागरिकांचा प्रॉपर्टी कार्ड व निवाऱ्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्‍वासन माजी आमदार अमल महाडिक यांनी दिले.

प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, ‘देशामध्ये सर्व धर्मातील जातींच्या लोकांना सन्मानाने जगता यावे. शब्द दिला तर खरा करून दाखविणारा नेता असावा. जे इतिहास घडवतात ते इतिहास कधीही विसरू शकत नाहीत. येथील बुद्ध विहारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांचे योगदान आहे त्यांचे यावेळी आभार मानतो. अशा वास्तूमुळेच समाज सुधारेल.’

प्रा. जयंत पाटील, महेश जाधव, स्वामी विवेकानंद संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, माजी नगरसेविका रूपाराणी निकम, प्रकाश अंगरखे, नंदकुमार गोंधळी, जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, आठवले गटाचे सुखदेव बुध्याळकर, विनोद शिंदे, सदाशिव सांगावकर, आदी उपस्थित होते. बुद्ध विहारचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

CIBIL Score: तुमचा CIBIL आताच सुधारा, जर तुमचा सिबिल खराब असेल तर नोकरीही मिळणार नाही

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

SCROLL FOR NEXT