कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांना मराठा मुलांची चिंता आता कशी पडली?'

या नेत्यांनी एकदा त्यांची प्रॉपर्टी जाहीर करावी; चंद्रकांत पाटील

संदीप खांडेकर

कोल्हापूर : १०२ व्या घटनादुरुस्तीने राज्याचे अधिकार काढून घेतले हे खरे नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) राज्य सरकारवर अंकुश ठेवायला कमी पडले. ते जर आता नाराज असतील तर त्यांनी त्यासाठी उशीर केला. त्यांच्या नाराजीने महाराष्ट्राचे (maharashtra) नुकसान झाले आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शासकीय जागांवर महाविद्यालये उभारुन परराज्यातील विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी शुल्क वसूल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur district) नेत्यांना मराठा समाजातील मुलांची चिंता आता कशी पडली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पाटील म्हणाले, 'भाजपचे (BJP) सरकार केवळ दोन वेळा सत्तेत होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) देऊन ते टिकवले. सत्तेतील ज्या त्या जातींच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जातींना न्याय मिळवून दिला. मराठा समाजातील नेत्यांनी तसे केले नाही. बँका, पतसंस्था, कारखान्यांत त्यांची सत्ता असताना त्यांनी सेल्फ डिक्लेअर रिझर्व्हेशन म्हणून किती मराठा तरुणांना मेरीटवर नोकरीत सामावून घेतले? शरद पवार, अजित पवार, अशोक चव्हाण, पतंगराव कदम यांनी मराठा समाजासाठी काय केले? मराठा समाजातील नेत्यांच्या गाड्यांमागे हे तरुण केवळ 'जिंदाबाद, जिंदाबाद' म्हणून घोषणा देत राहिले. या नेत्यांनी एकदा त्यांची प्रॉपर्टी जाहीर करावी.'

ते म्हणाले, 'साध्या स्कूटरवरून फिरणार्‍या जिल्ह्यातील नेत्यांनी शासकीय जागा घेऊन महाविद्यालय बांधली. हरियाणा, पंजाब, जम्मू कश्मीर येथील विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी शुल्क आकारून प्रवेश दिला. त्यावेळी त्यांना मराठा विद्यार्थ्यांची चिंता का दिसली नाही?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT