Changes in the kolhapur city transportation routes way to this road 
कोल्हापूर

कोल्हापूरातील वाहतूक मार्गात बदल; असा आहे पर्यायी मार्ग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात अमृत योजनेचे काम सुरू असून हे काम नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. ऊस वाहतूक व करणाऱ्या अवजड वाहनांना आजपासून पर्यायी मार्ग 10 डिसेंबरअखेर उपलब्ध करून दिले आहेत. वाहन चालकांनी दिलेल्या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. 

वाहतुकीस प्रवेश बंद व पर्यायी मार्ग 
* छत्रपती शिवाजी महाराज पूल ते गंगावेशकडे जाणारी सर्व जड, अवजड, हलकी तसेच ऊस वाहतूक ट्रक्‍टर ट्रॉलीला प्रवेश बंद. 
* शिवाजी पुलाकडून गंगावेशकडून जाणारी वाहने तोरस्कर, सोन्या मारुती, सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोड, माकळर तिकटी, छत्रपती शिवाजी पुतळा ते गंगावेश अशी पुढे जातील. 
* गंगावेशकडून शिवाजी पुलाकडे जाणारी वाहने पापाची तिकटी, माळकर तिकटी, भाऊसिंगजी रोड, सीपीआरचौक या मार्गाने मार्गस्थ होतील. 

ऊस वाहतूक वाहनांना पर्यायी मार्ग 
बालिगाकडून येणारे- फुलेवाडी, रंकाळा टॉवर, रंकाळा स्टॅंन्ड, गंगावेश, सीपीआर सिग्नल चौक, महावीर कॉलेज, कसबा बावडा मेन रोड, राजाराम कारखान्याडे जातील. 

भोगावती ते कळंबा 
पुईखडी, नवीन वाशीनाका, रिंगरोड कळंबा, संभाजीनगर, रिंगरोड, सायबर चौक, हायवे कॅन्टीन वळण, उड्डाण पूल, ताराराणी पुतळा, सदरबाजार, धैर्यप्रसाद हॉल, पोलिस अधीक्षक कार्यालय, कसबा बावडा मार्गे कारखान्याकडे जातील. 

तावडे हॉटेल मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी 
*तावडे हॉटेलकडून येणारी वाहने ताराराणी चौक, सदर बाजार, धैर्यप्रसाद हॉल चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय, कसबा बावडामार्गे साखर कारखान्याकडे जातील 
* ताराराणी चौक, सदर बाजार, धैर्यप्रसाद हॉल, मुख्य पोस्ट ऑफीस, महावीर कॉलेज, सीपीआर सिग्नल चौक, छत्रपती शिवाजी महाराज पूल चौक, गंगावेश, रंकाळा स्टॅंन्ड, रंकाळा टॉवर, फुलेवाडी मार्गे कारखान्याकडे. 

बिद्री कारखाना 
ताराराणी चौक, उड्डाण पूल, हायवे कॅन्टीन चौक, सायबर चौक, रिंगरोड, संभाजीनगर, कळंबा मार्गे बिद्री कारखाना 

भोगावती कारखाना 
ताराराणी पुतळा, उड्डाण पूल, हायवे कॅन्टीन चौक, सायबर चौक, रिंगरोड, संभाजीनगर, कळंबा साई मंदिर, रिंगरोड, नवीन वाशीनाका, भोगावती कारखाना 

दत्त दालमिया कारखाना 
महामार्गावरून शिये सर्व्हीस रोड, भुयेवाडी मार्गे कारखान्याकडे 

ऊस वाहतूक रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत 
फुलेवाडी, रंकाळा टॉवर, रंकाळा स्टॅंन्ड, गंगावेश, छत्रपती शिवाजी महाराज पूल, सीपीआर सिग्नल चौक, महावीर कॉलेज, कसबा बावडा, राजाराम साखर कारखान्याकडे येणारी व जाणारी ऊस वाहतूक रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बंधनकारक आहे.

संपादन - अर्चना बनगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT