आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग, ऊर्जेशी संबंधित आहे. संपन्न व्यक्तिमत्त्व, अध्यात्मात आवड, प्रगतीचा ओढा असणं, इच्छाशक्ती, संघर्ष करायची तयारी, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, स्वाभिमान, स्वतःची आणि आपल्याबरोबर असणाऱ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी हे गुण दर्शवितो. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपली मानसिक शक्ती तसेच डाव्या मेंदूस (Logical Brain ) सक्रिय करतो. एखाद्याच्या डोक्यावर चमकदार, पिवळे फिकट बल्ब असलेले चित्र आपल्याला आठवते का? याचा अर्थ पिवळा रंग तार्किक निराकरण शोधण्यात मदत करतो.
हा रंग ज्यांना आवडतो त्यांची बुद्धी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते. ते वैयक्तिकरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. जे अजून प्राप्त झालं नाही, त्याची प्रतीक्षा करण्याची संयमी वृत्ती या रंगाने लाभते. स्पष्ट विचार करणारे आणि त्वरित निर्णय घेणारे असतात.
फूड इंडस्ट्री, क्रीडा क्षेत्र, स्पा, ब्युटी पार्लर येथील इंटिरिअर डेकोरेशन, टेबल मॅट्स, नॅपकिन, पोस्टर्स अशा एकंदर वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये तसेच यांच्या लोगोंमध्ये पिवळ्या रंगाचा वापर अधिक केला गेल्याचे दिसून येते. तेजस्वी, शुद्ध पिवळा एक लक्ष वेधण्यासाठी पिवळा रंग खूप प्रभावी आहे. म्हणूनच टॅक्सी कॅब, रिक्षा काळ्या न पिवळ्या रंगसंगतीत दिसतात. डिझाइनमधील महत्त्वाच्या घटकांना ठळक करण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर होतो. मुलांसाठीची उत्पादने आणि विश्रांतीशी संबंधित असलेल्या गोष्टींचा प्रचार करण्यासाठी पिवळा निवडू शकतो.
ऍसिडिटी, पचनाच्या तक्रारी, जळजळ होणे, फूड ऍलर्जी, बद्धकोष्ठता, गॅस, हायपोग्लायसेमिया आदी तक्रारी असल्यास जेवणा-खाण्यामध्ये पिवळ्या रंगाच्या भाज्या, फळे, स्वीट कॉर्न आदींचा समावेश करावा. लवकर आराम मिळेल. (इथे औषध बंद करणे अभिप्रेत नाही)
वेगवान, उष्ण अन् अस्थिर
रंगात नकारात्मक वैशिष्ट्येदेखील आहेत. आवेगपूर्ण कृती, अहंकार, जास्त वेगवान आणि उष्ण आहे. तसेच अस्थिर आणि उत्स्फूर्त आहे, म्हणून जर आपल्याला स्थिरता आणि सुरक्षितता सुचवायची असेल तर पिवळा रंग वापरणे टाळावे. जास्त वापराने चिंताग्रस्तता आणि भावनिक अस्थिरता जाणवू शकते. पिवळ्या खोल्यांमध्ये बाळं अधिक रडतात. किमती वस्तू पिवळ्या रंगात सहसा खरेदी केल्या जात नाहीत. एखाद्या कंपनीचा Dress Code पिवळ्या रंगाचा असू शकत नाही; पण एअर होस्टेसच्या Dress code साठी Golden Yellow सारखी एखादी शेड निवडली जाऊ शकते.
क्षणभर विचार केल्यास या विश्वामध्ये रंगच नसते तर? रंगांनी नटलेली सृष्टी, तिचे सौंदर्य पाहताना मिळणारा आनंदच हरवला असता. सूर्योदय, सूर्यास्त तोच असला तरी आकाशाच्या कॅनव्हासवर रोज वेगळे चित्र रंगवले जाते. छोटे फुल, प्राणी, पक्षी, कीटक, किडे बारकाईने पाहिले तर रंगाची उधळण दिसते. सारा निसर्ग भरभरून आपल्या जीवनात रंग भरू पाहतोय, मग माझे जीवन बेरंगी कसे असेल? तसे असेलच तर "बेरंगी जीवन' हा माझा हट्ट असणार आहे. नियतीचा खेळ वगैरे बिलकुलच नाही.
आत्मविश्वास वाढवतो...
पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा आहे. मनाला आनंदी आणि उत्साही ठेवणारा आहे. म्हणूनच एखादी महत्त्वाची मीटिंग आहे, एखादा व्यवहार पक्का करायचा आहे, प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास जायचे आहे तर ड्रेस/शर्ट पिवळ्या रंगाच्या शेडमधील निवडावा. मूड खराब आहे, खूप निराश वाटतंय, काही कारावंसं वाटत नाही, अशा वेळेस bright yellow रंगाचा ड्रेस घातल्यास मनःस्थिती सुधारल्याचे नक्की जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.