Chhagan Bhujbal News 
कोल्हापूर

Chhagan Bhujbal News: बीड येथील सभेत टीका तर कोल्हापुरातील सभेत कौतुक; शरद पवारांबाबत छगन भुजबळ काय म्हणाले?

Sandip Kapde

Chhagan Bhujbal News: अजित पवार गटाने आज कोल्हापुरात उत्तरदायीत्व सभा घेतली. यापूर्वी शरद पवार यांनी कोल्हापुरात सभा घेतली होती. त्याला उत्तर म्हणून अजित पवार गटाने ही सभा घेतली. या सभेत बोलतांना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.

लोक विचारतात सत्तेत का गेले? आम्ही महाराष्ट्रातील लोकांसाठी, विकासासाठी सत्तेत सहभागी झालो. महात्मा फुले यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही सत्तेत राहुल लोकांचा विकास करु शकता. डॉ बाबासाहेब आंबेडकर जर सत्तेत गेले. दिल्लीत गेले, मंत्री झाल्यानंतर त्यांनी संविधानात समान न्याय दिला कारण ते सत्तेत गेले होते, असे भुजबळ म्हणाले.

बीड येथील सभेत पवार साहेबांना मी काही वाईट बोललो नाही. मी माझे दु:ख सांगितले. अनेकांनी माझ्यावर टीका केली. पण मनातील दु:ख सांगायचं नाही का? आम्ही फक्त प्रश्न विचारला. आम्ही आता लोकांची सेवा करायची ठरवलं आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळांनी केले शरद पवारांचे कौतुक

६ जून १९९३ जालन्यात महात्मा समता परिषदेची एक लाख लोकांची रॅली झाली. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. व्ही पी सिंग यांनी लागू केलेलं आरक्षण शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय घेतला. धनगर, तेली, माळी, कुणबी या सर्वांना आरक्षण देण्याचे काम पवारसाहेबांनी केलं ते आम्ही विसरु शकत नाही. ५४ असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पण ते आरक्षण टिकावू असाव, कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे छगन भुजबळ म्हणाले.

बीड येथील सभेत छगन भुजबळ काय म्हणाले होते? 

छगन भुजबळ यांनी बीड येथील सभेत पहाटेच्या शपतविधीबद्दलही भाष्य केले होते. अजित पवार यांनी सकाळी शपथ घेतली होती. यावर शरद पवार म्हणाले, गुगली टाकली होती. राजकारणात अशी गुगली असते का ? गुगलीत स्वत:च्या प्लेअरला आऊट करायचं असतं का?", असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता.

शरद पवार यांनी जेव्हा येवल्यात सभा घेतली होती, तेव्हा त्यांनी येवल्यातील जनतेची माफी मागितली होती. यावर देखील भुजबळ यांनी शरद पवार यांना सवाल केला होता. "शरद पवार म्हणतात, माझी चूक झाली, माफी मागतो. कारण उमेदवार चुकीचा दिला. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागाची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल," असे छगन  भुजबळ म्हणाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT