कोल्हापूर

बापरे : या गावात चिकन मिळतय दहा रुपये किलोने....

रणजित कालेकर

आजरा : अंकिता पोल्ट्री दस रुपये किलो..... लो... लो.... अशी आरोळी आजऱ्याच्या आठवडी बाजारात ऐकू येत होती. प्रति किलो दहा रुपये दराने पंचवीस रुपयांना सव्वा दोन किलोची कोंबडी मिळत असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली होती. पोल्ट्री धारकांना कोंबड्याची कवडी मोलाने विक्री करावी लागत होती. कोंबडी बाजारातील हे चित्र धक्का देणारे होते. 

कोरोना विषाणूचा फैलाव जगभर झाला आहे. पण त्याचा परिणाम व्यापार उद्योगावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील लहान मोठ्या उद्योगांना चांगलाच फटका बसला आहे. आजरा तालुक्‍यात पोल्ट्री उद्योगाचे कंबरडेच मोडले आहे. चिकन खाल्यामुळे कोरोना होते अशी अफवा व गैरसमज समाजात पसरल्यामुळे याचा मोठा तडाखा तालुक्‍यातील पोल्ट्री उद्योगाला बसला आहे.

कोंबड्याचे दर पडले

गोव्याच्या बाजारपेठेवर येथील पोल्ट्री उद्योग अवलंबून होता. या बाजारपेठेतून मागणी घटल्यामुळे कोंबड्याचे दर पडले आहेत. पोल्ट्रीधारकांना कवडी मोल भावाने पक्षी विकावे लागत आहेत. आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍यातील विविध गावातील आठवडी बाजारात पोल्ट्रीधारक पक्षी विकत असल्याचे चित्र आहे.

पंचवीस रुपयाला कोंबडी​

आज शुक्रवार आजऱ्याच्या आठवडी बाजारात प्रति किलो 10 रुपये या दराने कोंबड्याची विक्री झाली. पंचवीस रुपयाला कोंबडी मिळत असल्याने ग्राहकांची झुंबड कोंबडीच्या गाडीभोवती जमल्याचे चित्र होते. अंकिता पोल्ट्री फिडस पेद्रेवाडी फर्मचे दोन हजार पक्षी विकले गेले. तासभरात गाडी खाली झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

खर्च 70, विक्री 10 ने... 
एक किलोचा पक्षी तयार होण्यासाठी सत्तर रुपये खर्च येतो, पण पक्ष्यांची विक्री दहा रुपये प्रति किलो दराने करावी लागत आहे. एकीकडे पक्ष्यांना धान्य नसल्याने खर्च परवडेना. तर दुसरीकडे ऐंशी टक्के पक्षी विक्रीमध्ये पोल्ट्री धारकांना तोटा सहन करावा लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT