कोल्हापूर

कोल्हापूरमधील शास्त्रीनगर मैदानाचे पालटले रुपडे

डिझायनर ग्रास कटिंगने ऑस्ट्रेलियन लॉनचा गालिचा खुलला

सुयोग घाटगे

कोल्हापूर : येथील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदानाचे(international level cricket ground) रुपडे पालटले आहे. मैदानावरील ऑस्ट्रेलियन लॉनचा हिरवागार मखमली गालिचा डिझायनर कटिंगमुळे आणखीच खुलला आहे. मैदानाचे काम अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारीत मैदान खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

शास्त्रीनगर मैदान (shashtrinagar ground)महापालिकेच्या(kolhapur carporation) अखत्यारीतील. सध्या या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च करून चार लाईट टॉवर उभारले आहेत. प्रत्येक टॉवरवर असणाऱ्या अंतरराष्ट्रीय दर्जाच्या या लाईटमुळे दिवस रात्रीचे सामने खेळवणेही शक्य होणार आहे. तसेच संपूर्ण मैदानावर स्वयंचलित पाणी फवारणी यंत्रणाही कार्यान्वित केली आहे. प्रेक्षकांसाठी मैदानावर उतार असणारी बैठक व्यवस्था बनवण्याचे काम अंतिम टप्‍प्यात आहे. या नंतर मैदान बंदिस्त करण्याचे आणि पॅव्हेलियन बनवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. मैदानावरील ऑस्ट्रेलियन लॉनची पूर्ण वाढ झाली असून, मैदानावर सर्वत्र समपातळी निर्माण झाली आहे.

याची अद्यावत ग्रास कटरने(grass cutter) तज्ज्ञ गार्डनरकडून कटिंग केले जात आहे. डिझायनर कटिंगमुळे हे मैदान अधिकच आकर्षक दिसत आहे. मैदानासाठी सागर माळ स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, सेक्रेटरी किरण खतकर, संभाजी जाधव, उमेश पालकर, विजय कोंढेकर, रमेश घाटगे, असिफ कुडचिकर, निरंजन घाटगे यांच्या प्रयत्नाने या मैदानाचे काम सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महापालिकेच्या इतिहासातील हे अशा स्वरूपाचे पहिले मैदान ठरणार आहे. कोल्हापूरमधून हद्दपार झालेले रणजी सामने येथे पुन्हा सुरू होण्याची आशा या मैदानामुळे पुनरुज्जीवित होणार आहे.

-काकासाहेब पाटील,

अध्यक्ष, सागरमाळ स्पोर्टस्‌ असोसिएशन

दृष्टिक्षेपात मैदान

  1. क्षेत्रफळ सहा एकरहून अधिक सात इंटरनॅशनल विकेट

  2. टर्फ ग्राउंड ऑस्ट्रेलियन लॉन दिवसरात्र सामने खेळण्यासाठी

  3. लाईटची अद्यावत सुविधा कार्यान्वित याची उंची १०० फूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bapu Pathare: १०० लोक जमा केले अन्...; बापू पठारेंना मारहाण का झाली? पत्रकार परिषदेत आमदारांनी संपूर्ण विषयच उलगडून सांगितला!

दिवाळीत Invitation Cards बनवायचयं? तर Google Geminiचे 'हे' प्रॉम्प्ट वापरा

World Cup 2025: भारताने जिंकलेला टॉस? पण पाकिस्तानी कर्णधार राहिली चूप; IND vs PAK सामन्यापूर्वीच वादग्रस्त घटना; Video

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा ट्रॅक्टरमधून प्रवास

SCROLL FOR NEXT