Ramraje Nimbalkar
Ramraje Nimbalkar Sakal
कोल्हापूर

कोल्हापुरात सर्किट बेंचसाठी सर्वपक्षीयांचा मुंबईत निर्धार

लुमाकांत नलवडे

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात करण्यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा करावी.

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai high Court) सर्किट बेंच (Circuit Bench) कोल्हापुरात करण्यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांची (Chief Minister) भेट घेऊन त्यांनी मुख्य न्यायमूर्ती (Chief Justice) यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा (Discuss) करावी, अशी विनंती केली जाईल, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी आज मुंबईत जाहीर केले.

तसेच जोपर्यंत लढ्याला यश मिळत नाही तोपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार ही आजच्या बैठकीत सहा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केला.

सहा जिल्ह्यातील सर्वपक्षीय मंत्री, आमदार, खासदार यांची बैठक कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारातून मुंबईतील महिला विकास मंडळाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य कोल्हापूरचे अॅडवोकेट विवेक घाटगे यांनी आता 35 वर्षे झालेली चर्चा पुन्हा नको सर्किट बेंच व्हावे, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकजूट करून मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनी मुख्य न्यायमूर्तींची सकारात्मक चर्चा करावी अशी मागणी केली. बार कौन्सिलचे सिंधुदुर्ग चे सदस्य संग्राम देसाई यांनी आजपर्यंत आलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी मदत केली आहे. आता निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

मंत्री सतेज पाटील यांनी सहा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर आहेत यावरुनच कोल्हापूरला कोणाचाही विरोध नसल्याचे स्पष्ट होते सर्किट बेंचसाठी आवश्यक सर्व इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी सकारात्मकता दाखवली आहे, आता मुख्यमंत्री यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सकारात्मक चर्चा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्व कमी होणार नसल्याचे स्पष्ट केले.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री मुख्य न्यायमूर्तींची सकारात्मक चर्चा करतील, असा विश्‍वास दाखविला.

यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आरोग्य राज्यमंत्री राजेद्र -पाटील यड्रवकर, गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार वैभव नाईक, आमदार सुमन पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार सर्वश्री अरुण लाड, राजन साळवी, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, राम सातपुते, सदाभाऊ खोत, रणजितसिंह निंबाळकर, यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यातील विधिज्ञ उपस्थित होते.

कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीष खडके यांनी आभार मानले.

सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष सुखदेव पाटील, सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांचे अध्यक्ष राजेंद्र राणे, रत्नागिरी बारचे अध्यक्ष दिलीप धारिया माळशिरस बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन खराटे यांच्यासह सहा जिल्ह्यातील विधीज्ञ उपस्थित होते. उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, सचिव विजयकुमार ताटे- देशमुख, संदीप चौगुले सम्राट शेळके सुशांत चेंडके संकेत सावर्डेकर यांनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT