closure of the passport center in Belgaum due to Corona, the problems of the citizens have increased 
कोल्हापूर

बेळगावात पासपोर्ट केंद्राला चांगला प्रतिसाद होता पण....

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - लॉकडाऊनमुळे गत तीन महिन्यांपासून बेळगावातील पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) बंदच आहे. यामुळे बेळगावकरांना पासपोर्टसाठी हुबळी येथील पासपोर्ट सेवा केंद्राला (पीएसके) जावे लागत आहे. यामुळे कोरोनाची खबरदारी घेऊन शहरातील पीओपीएसके सुरु करावे अशी मागणी शहरवासियातून होत आहे.

कोरोनामुळे 24 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागु करण्यात आला. दोन महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतर महिनाभरापासून लॉकडाऊनमध्ये सुट देण्यात आली आहे. यामुळे काही निवडक वगळता सर्व व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही पीओपीएसके बंद असल्याने पासपोर्ट काढताना अडचणी वाढल्या आहेत.

राज्यात गत काही दिवसांपासून हुबळी, बेंगळूर, गुलबर्गा व मंगळूर येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) सुरु करण्यात आली आहेत. मात्र, पोस्ट कार्यायलयात असलेली राज्यातील सर्व पीओपीएसके अजूनही सुरु करण्यात आलेली नाहीत. यामुळे संबंधीत जिल्ह्यातील नागरिकांना अडचणी येत आहेत. बेळगावात सुमारे अडीच वर्षापूर्वी पीओपीएसके सुरु करण्यात आले. सुरुवातील 40 जणांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ही तपासणी शंभर पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लॉकडाऊनपूर्वी 50 जणांच्या अर्जांची तपासणी केली जात होती. लॉकडाऊनमुळे सर्व पीओपीएसके बंदच आहेत. या विभागातील कर्मचाऱ्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

बेळगावात पासपोर्ट सुुरु झाल्यापासून पासपोर्ट केंद्राला चांगला प्रतिसाद होता. मात्र, कोरोनामुळे सध्या केंद्र बंद असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे, काही दिवसानंतर विमानसेवा सुरु झाल्यास परदेशात जाणाऱ्यांना पासपोर्टची गरज असते. बेळगावातील पीओपीएसके बंद असल्याने अनेक जण पासपोर्ट काढून घेण्यासाठी हुबळीला जात आहेत. यामुळे योग्य खबरदारी घेऊन शहरातील पीओपीएसके सुरु करावे अशी मागणी होत आहे.


कोरोनामुळे शहरातील पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्र बंद आहे. सध्या हुबळी, बंगळूर, गुलबर्गा, मंगळूर येथील पासपोर्ट सेवा केंद्र सुरु केली आहेत. बेळगावातील केंद्र सुरु करण्यासाठी कोणताही आदेश आलेला नाही. सुरु करण्यासंबंधी आदेश आल्यानंतर तातडीने सुरु करण्यात येईल.
- कावेरी पाटील, इनचार्ज, पासपोर्ट सेवा केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT