CM K Chandrasekhar Rao esakal
कोल्हापूर

K Chandrasekhar Rao : 'दलितांनी किती वर्षे संघर्ष करायचा? बराक ओबामाला अध्यक्ष करून त्यांनी पापक्षालन केलं'

‘आम्ही कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही, कोणाच्या बाजूने राहू इच्छित नाही'

सकाळ डिजिटल टीम

‘राष्ट्रवादी व शिवसेनेत फूट पडली आहे. कॉंग्रेसमध्ये पुन्हा फूट पडेल, असा चर्चेचा सूर आहे. जनतेलाही तसे वाटते. ही स्थिती पाहून काही युवा मतदारांनी आपले ओळखपत्रच पेटवून दिले आहे.'

कोल्हापूर : ‘आम्ही कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही. कोणाच्या बाजूने राहू इच्छित नाही. आम्ही देशात परिवर्तन येण्यासाठी काम करत आहोत. आम्ही थांबणार नाही, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrasekhar Rao) यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रातील लोकांना राष्ट्रीय नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची ही क्रांतीची भूमी असून, या भूमीतून नवी क्रांती घडायला हवी’, अशी अपेक्षाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.

भारत राष्ट्र समितीला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाचे काय झाले, याचे उत्तर जनतेसमोर आले आहे, असाही त्यांनी टोला लगावला. श्री. राव कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राव म्हणाले, ‘निवडणुकीचा बिगूल आम्हीच वाजवला आहे. महाराष्ट्रात १४ लाख १० हजार लोक पदाधिकारी बनले आहेत. कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना लोकांनी चांगली संधी दिली. कॉंग्रेसची देशात पन्नास वर्षे सत्ता होती. त्या काळात त्यांनी काय केले, काय नाही, हे सर्वांना माहीत आहे.

भाजपच्या सत्तेचा परिणाम काय झाला? तर महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यात नद्या असूनही काही गावांत आठ दिवसानंतर पाणी मिळते, असा सूर ऐकायला मिळतो. दलितांनी किती वर्षे संघर्ष करायचा? अमेरिकेत काळ्या लोकांवर अन्याय केला जात होता. मात्र, बराक ओबामाला (Barack Obama) अध्यक्ष करून त्यांनी पापक्षालन केले. या प्रकारची जागरूकता देशात येणे जरूरीचे आहे.’

सरकारची शेतकऱ्यांकडे पाठ

‘राष्ट्रवादी व शिवसेनेत फूट पडली आहे. कॉंग्रेसमध्ये पुन्हा फूट पडेल, असा चर्चेचा सूर आहे. जनतेलाही तसे वाटते. ही स्थिती पाहून काही युवा मतदारांनी आपले ओळखपत्रच पेटवून दिले आहे. समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राला राष्ट्रीय नेतृत्त्व करण्याची संधी मिळत आहे. त्यात युवक व बुद्धीजीवींनी पुढे यावे. पासष्ट हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकार शेतकऱ्यांकडे पाठ करून बसले आहे’, असेही श्री. राव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT