Co operative elections after December Co operation information by Marketing Minister Balasaheb Pati press conference 
कोल्हापूर

सहकारी संस्थांच्‍या निवडणुका डिसेंबरनंतर: बाळासाहेब पाटील

सुनील पाटील

कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणूक प्रक्रिया डिसेंबरनंतर टप्प्या-टप्प्याने घेण्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाई व जोतिबा दर्शनासाठी श्री. पाटील काल कोल्हापुरात आले होते.

दरम्यान, सरकार घेत असलेल्या या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा बॅंक, गोकुळसह इतर महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.   
श्री. पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपला आहे. टप्प्या-टप्प्याने या निवडणुका होणे अपेक्षित होते. पण, कोरोना आणि त्यामध्ये असणाऱ्या लॉकडाउनमुळे या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. लॉकडाउन दरम्यान निवडणुका होतील, असेही वाटत होते. पण, ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढले.

त्यामुळे डिसेंबरनंतरच म्हणजे नव्या वर्षातच या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबरनंतर टप्प्या-टप्प्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका कशा पध्दतीने घेता येतील, याचे नियोजन केल आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याची शक्‍यता वर्तवली आहे. याचाही विचार करावा लागणार आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे. उपचार घेणारे रुग्णही कमी आहेत. मात्र गाफिल राहून चालणार नाही. कोरोना सुरक्षेबाबत सरकार सर्तक आणि दक्ष आहे. यातून कोरोना संसर्ग वाढला नाही किंवा सद्य परिस्थिती पुढेही राहिली तर निश्‍चितपणे निवडणुका होतील. यासाठी यंत्रण गतिमान केली जात आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT