Co operative elections postponed for three months 
कोल्हापूर

"गोकुळ', केडीसी संचालकांना पुन्हा मुदतवाढ ; कोल्हापुरातील तीन हजार संस्था संचालकांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालकांना दुसऱ्यांदा तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आज शासनाने घेतला. या निर्णयाने जिल्ह्यातील प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या जिल्हा दूध संघ (गोकुळ), जिल्हा बॅंकेसह तीन हजार संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने या संस्थांतील संचालकांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यात र्माचपासून कोरोना रूग्णांची संख्या सर्वच जिल्ह्यात वाढू लागली. या पार्श्‍वभुमीवर शासनाने पहिल्यांदा 18 मार्च रोजी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्याचा आदेश काढला. याच जिल्ह्यातील दरम्यान "गोकुळ' व "केडीसी'सह राजर्षी शाहू गर्व्हमेंट सर्वंटस्‌ बॅंक, राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. तर 18 मार्चनंतरच्या तीन महिन्याच्या कालावधीत विविध प्रकारच्या तीन हजार संस्थांच्या संचालकांचीही मुदत संपत होती. पण शासनाने या सर्व निवडणुका पुढे ढकलताना विद्यमान संचालकांनाच मुदतावढ दिली होती.

तीन महिन्यांची ही मुदत उद्या (ता. 18) संपत असतानाच आज शासनाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी पुन्हा या संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलताना विद्यमान संचालकांनाच मुदतवाढ देण्याचे आदेश काढले. राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतरही या साथीचा रोग आटोक्‍यात येण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नसल्याचे श्री. शिंगटे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. यातून उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्थांना वगळण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

Nalkehda Car Accident : रात्रीच्या अंधारात भाविकांवर काळाचा घाला! पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने ३ मुलांसह ८ जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT