Actor Sankarshan Karhade esakal
कोल्हापूर

Sankarshan Karhade : 'नाटक हा एक संसारच, तो निगुतीने करायला हवा'; असं का म्हणाले अभिनेते संकर्षण कऱ्हाडे?

नाटकाचा (Drama) व्यवसाय हा एक संसारच असतो आणि तो निगुतीने केल्यास नक्कीच त्यात यश मिळते.

सकाळ डिजिटल टीम

‘‘नाटक आणि कविता दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच पुढे गेल्या पाहिजेत. दोन्हींतून मिळणारा आनंद नक्कीच वेगळा असतो.''

कोल्हापूर : नाटकाचा (Drama) व्यवसाय हा एक संसारच असतो आणि तो निगुतीने केल्यास नक्कीच त्यात यश मिळते. त्यामध्ये प्रेक्षकांबरोबरच नाट्य वितरकांचे योगदानही मोलाचे राहिले आहे, असे मत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Actor Sankarshan Karhade) यांनी व्यक्त केले. चितळे डेअरी प्रस्तुत सकाळ नाट्य महोत्सवांतर्गत ‘नियम व अटी लागू’ हा नाट्यप्रयोग रंगला.

यानिमित्ताने झालेल्या ‘कॉफी वुईथ सकाळ’ या उपक्रमात त्यांनी मुक्तसंवाद साधला. व्यावसायिक रंगभूमीवर विविध प्रयोग करतानाच कवितांच्या माध्यमातूनही संकर्षण कऱ्हाडे यांनी तमाम मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आजवरच्या विविध कवितांच्या जन्मकथाही त्यांनी यावेळी शेअर केल्या.

ते म्हणाले, ‘‘नाटक आणि कविता दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच पुढे गेल्या पाहिजेत. दोन्हींतून मिळणारा आनंद नक्कीच वेगळा असतो. नाटक असो किंवा सिनेमात मुंबई, पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला संघर्ष हा असतोच. पण, तुमच्याकडे असणाऱ्या टॅलेंटच्या जोरावरच आपण या इंडस्ट्रीत घट्टपणे पाय रोवून उभे राहू शकतो.’’

दरम्यान, ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव, सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा यांच्या हस्ते कऱ्हाडे आणि प्रायोजकांचे सत्कार झाले. यावेळी चितळे डेअरीचे दिलीप आपटे, बटू बिल्डर्सचे अभिजित गायकवाड, नीलकमल फर्निचरचे संचालक सचिन सुराणा, शिवसमर्थ मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे संतोष पवार-देसाई आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT