College Student committed suicide esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : अकरावीत शिकणाऱ्या आर्यननं उचललं टोकाचं पाऊल; नैराश्यातून इमारतीवरून उडी मारुन केली आत्महत्या

आर्यनचे वडील शिवाजी विद्यापीठात नोकरी करतात. आर्यनला गेल्या तीन-चार महिन्यांपासून मानसिक नैराश्य जाणवत होते.

सकाळ डिजिटल टीम

आपण स्वतः उडी मारल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूर : अकरावीत शिकणाऱ्या (College Student) आर्यन राजेंद्र पाटील (वय १६, रा. बळवंतनगर, पाचगाव, ता. करवीर) याने नैराश्यातून आत्महत्या केली. शाहू नाका परिसरातील एका अर्धवट बांधलेल्या इमारतीवरून त्याने उडी मारली.

त्याला सीपीआरमध्ये (CPR) उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनचे वडील शिवाजी विद्यापीठात नोकरी करतात. आर्यनला गेल्या तीन-चार महिन्यांपासून मानसिक नैराश्य जाणवत होते. त्यासाठी तो उपचारही घेत होता.

काल संध्याकाळी तो मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर पडला. शाहू नाका येथील एका क्रीडांगणावर तो खेळत होता. तेथून तो घरी जातो असे सांगून तो निघाला, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. यावेळी तो शाहू नाका परिसरातील एका अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळ पडला होता.

आपण स्वतः उडी मारल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आर्यनच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे.

कोणत्याही गोष्टींमध्ये येणारे अपयश पचवता आले नाही की नैराश्य येते. यासाठी तरुण-तरुणींनी सांघिक मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यातून पराभवही पचवता येतो. पालकांनी मुलांशी मुक्तपणे संवाद केला पाहिजे. मित्र-नातेवाईक यांच्यामध्ये मुलांनी मिसळले पाहिजे. त्यातून एकटेपणा जाणवत नाही.

-डॉ. आश्विन शहा, मानसोपचार तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT