Complicated heart surgery successful or two years child in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात दोन वर्षाच्या चिमुकल्यावर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी 

शिवाजी यादव

कोल्हापूर - सीपीआर रूग्णालयाच्या हृदयशस्त्रक्रिया विभागात दोन वर्षाच्या बाळावर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी झाली आहे. हृदयाच्या शुध्द रक्त वाहणीत व झडपे मध्ये असलेला जन्मजात दोष निवारण करणेही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. शासकीय योजनेचा लाभ देत शस्त्रक्रिया मोफत झाली. हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना, डॉ. वरूण देवकाते यांच्या सहपथकानेही शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

कोरोनाकाळात त्या बाळाला थकवा वाटत होता. खेळताना छातीचे ठोके वाढत होते. हृदयात आवाज येत होता. म्हणून खासगी रूग्णालयात दाखविले मात्र हृदयविकारातील गुंतागुंत व उपचाराचा खर्च मोठा असल्याने अखेर या बाळाला सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया विभागात दाखविण्यात आले. येथे विविध तपासण्या झाल्यानंतर बाळाच्या हृदयदोष आढळला. 

हृदयामधून बाहेर निघणारी मुख्य रक्त वाहीनी शरिराराला रक्त पुरवठा करते. त्या शुध्द रक्त वाहीणीच्या तोंडावर झडप असते. सामान्य व्यक्तींच्या झडपेमध्ये तीन पाकळ्या असतात. मात्र या बाळाला जन्मजात झडपेतील दोन पाकळ्या बंद होत्या. 

त्यामुळे एकाच झडपेतून रक्त प्रवाहापुढे जात असताना बाळाच्या हृदयावरील ताण वाढत होता. हा ताण 200 टक्के होता नियमित व्यक्तीमध्ये हा ताण शंभर पर्यंत असतो. ताण वाढला परिणामी हृदयावर ताण पडून हृदयावर पंपिग प्रक्रियाही क्षीण झाली होती. असेही तपासणीत दिसले. 

त्यानंतर याबाळावर बिन टाक्‍याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऍटलास बलून व्हॉल्वोटॉमी व्दारे दोन्ही पाकळ्या खुल्या केल्या. त्यामुळे बाळाच्या बंद असलेल्या झडपेतील दोन्ही पाकळ्या खुल्या झाल्याने हृदयावरील ताण कमी झाला. बाळाची प्रकती सुधारत आहे. 

बाळाला पूर्ण भूल न देता केवळ ऑक्‍सिजनच्या आधारे शस्त्रक्रिया केली, 40 मिनिटातही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अशी माहिती डॉ. बाफना यांनी दिली. 
भूल तज्ञ डॉ. निलेश जावे, डॉ. वरून देवकाते, देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे आदीच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 

अनेक रूग्णालयात बाळाला दाखविण्यात आले होते. गुंतागुंतीचा हृदयविकार होता जोखीम पत्करून शस्त्रक्रिया करावी लागणारी होती, त्यामुळे उपचाराचा खर्चही काह लाखात होता. तो भरणे शक्‍य नसल्याने संबधीत बाळाला सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागात उपचाराला आणले येथे शासकीय योजनेचा लाभ देत मोफत शस्त्रक्रिया झाली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT