compulsion of fees from private school management to parents 
कोल्हापूर

खासगी शाळांकडुन पालकांवर शुल्क भरण्याची सक्‍ती ; पालकांची चिंता वाढली...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांकडून शुल्क जमा करण्यास खासगी शाळांना शिक्षण खात्याने परवानगी दिली आहे. याचा लाभ उठवित अनेक खाजगी शाळा शुल्क भरण्यासाठी पालकांवर सक्‍ती करीत आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांची चिंता वाढली असुन शिक्षण खात्याने शुल्क भरण्याची सक्‍ती करणाऱ्या शाळांना समज देण्याची मागणी होत आहे.
शहर आणि परिसरात विनाअनुदानित शाळांची संख्या मोठ्‌या प्रमाणात आहे. तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणिय प्रमाणात असुन एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास अडचण निर्माण होत असल्याने खासगी शाळांनी प्रवेश शुल्क भरून घेण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली होती याची दखल घेत शुल्क वसुल करण्यास परवागनी देण्यात आली होती. मात्र कोणत्याही पालकावर शुल्क भरण्याची सक्‍ती करु नये असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अनेक शाळा नियम डावलुन शुल्क वसुल करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

लॉकडाउनमुळे सर्व शाळा मार्चपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच पुढील आदेश येईतोंपर्यंत एलकेजी, युकेजी व पहिलीची प्रवेश प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या लॉकडाउन असला तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम दिला जात आहे. अभ्यासक्रम देण्यास सुरुवात झाल्यापासुन शाळांकडुन व्हॉट्‌सऍप, मोबाईल संदेश किंवा ईमेल करून पालकांना शुल्क भरण्याची माहिती दिली जात आहे. मात्र अनेक पालक शुल्क भरण्यास वेळ मागत असुन नियमाप्रमाणे त्यांना तशी सूट देण्याची गरज आहे मात्र थोडी रक्‍कम तरी भरा असे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांमधुन तिव्र नाराजी व्यक्‍त होत असुन कोणत्याही पालकावर शुल्क भरण्यासाठी दडपण घालू नये असे मत पालकांमधुन व्यक्‍त होत आहे.खासगी शाळांनी सामाजिक अंतर राखत प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी मागितली आहे; परंतु याबाबत 17 मेनंतर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शिक्षण खात्याने दिली आहे.

kolhapur poltics
 

लॉकडाउनमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच रोजगारही बंद असल्याने अनेकांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकांकडून शुल्क घेताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दखल शाळांनी घ्यावी. शाळांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावला तर कारवाई केली जाईल.
ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT