condition of blood bank of kolhapur district vaccination of people 
कोल्हापूर

धक्कादायक! कोल्हापुरात आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा; व्हॅक्सिनेशनआधी करा रक्तदान

अर्चना बनगे

कोल्हापूर : राज्यात कोरोना संकटा बरोबरच आता रक्ताच्या तुटवड्याचे संकट ओढवले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेश शिंदे यांनी राज्यात आठवडाभर पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करा असे आवाहन त्यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती रक्तसाठा आहे. याचा आढावा घेतला तेव्हा असे लक्षात आले की, कोल्हापूरमध्ये आठ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक आहे.

कोल्हापूरात सीपीआर सह 16 रक्तपेढ्या आहेत. यामध्ये महापालिकेची एक आणि अन्य खासगी 15 रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये प्रतिदिन सरासरी 45 ते 50 पिशव्या रक्तदान होते. सध्या हे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. कोल्हापूरमध्ये सध्या संजीवन ब्लड बँक यांच्याकडे 323 सर्वात जास्त रक्तसाठा शिल्लक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी 60 वर्षावरील नागरिक कोरोना लस घेत होते. मात्र आता 45 वर्षावरील नागरिकांनीही लस घेण्यास सुरुवात केली आहेत. त्यामुळे रक्ताचा पुरवठा कमी होण्याची दाट शक्यता आहे. याचे कारण लसीकरणापूर्वी रक्तदान करावे लागते. लसीकरण झाल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

3 एप्रिल पर्यंत कोल्हापुरात असलेला रक्तसाठा

  • सी. पी. आर. जी एम सी ब्लड  -109 
  • के. एम. सी. ब्लड बँक  -43
  • राजश्री शाहू ब्लड बँक  -76
  • जीवनधारा ब्लड बँक -280
  • तुलसी ब्लड बँक -222
  • अर्पण ब्लड बँक -142
  • वैभव लक्ष्मी ब्लड बँक -95
  • अण्णासाहेब घाडगे ब्लड बँक -172
  • लायन्स ब्लड बँक इचलकरंजी -85
  • डॉक्टर डी. वाय. पाटील ब्लड बँक -24
  • आधार ब्लड बँक -90
  • संजीवन ब्लड बँक -323
  • एकूण  -1661

"जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्यामुळे येत्या आठ दिवसात आम्ही रक्त संकलन करण्याचे नियोजन केले आहे. येत्या काही दिवसात साडेतीन ते चार हजार पिशव्या रक्त संकलन करून जिल्ह्यात तसेच राज्यात जिथे आवशक्यता तेथे रक्त पोहोच करणार आहोत."

- राजेंद्र पाटील-यड्रावकर,आरोग्य राज्यमंत्री 

"सध्या आठ दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक आहे. तरी नागरिकांनी व्हॅक्सिनेशनच्या आधी रक्तदान करून सहकार्य करावे."

- डॉ. दीपा शिपूरकर,जिल्हा रक्तसंकलन समन्वय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT