confusion among teachers because How to be meritorious
confusion among teachers because How to be meritorious 
कोल्हापूर

परीक्षा रद्द झाल्या, पण गुणदान कसे होणार? 

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद करून परीक्षा स्थगित केल्या आहेत. प्राथमिक विभागाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा आदेश असला तरी हे गुणदान कसे व्हावे, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडून कोणत्या सुचना येणार याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.


जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपालिका, खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. परीक्षा रद्द करताना विद्यार्थ्यांना एकूण वार्षिक अहवालावरून सरासरी गुण देण्यात यावे, अशी सूचना असली तरी नेमका कोणता पर्याय अवलंबविण्यात यावा, याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. मे महिन्यात वार्षिक परीक्षांचे निकाल जाहीर करून पुढील शैक्षणिक वर्षांचे नियोजन सुरू होते ; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. हा कालावधी तीन मेपर्यंत असताना शिक्षण विभागाकडून मूल्यांकन कसे करावे, एक मे रोजी होणारा महाराष्ट्र दिन कसा साजरा करावा, अशा वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत. शिक्षण विभागाने २०१०च्या शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक वर्षांतील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात ‘आकरिक’ आणि ‘संकलित’ मूल्यमापनद्वारे मूल्यमापन करण्यात येते. यामध्ये मराठी,  हिंदी,  इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास,  सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील दोन्ही सत्रातील आकरिक आणि संकरित मूल्यमापन याचा विचार करत एकूण गुणांचे मूल्यमापन होते. यंदा करोनामुळे वार्षिक परीक्षा झाल्या नसल्याने संकरित मूल्यमापनास अडचणी येणार आहेत. पर्यायाने आकरिक मूल्यमापनानुसारच गुणदान करण्यात यावे अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत ; मात्र  याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन नंतरच गुणदान व निकालविषयी मार्गदर्शक सूचना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आकरिक मूल्यमापन म्हणजे काय?

दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक, प्रयोग, उपक्रम कृती, प्रकल्प, चाचणी परीक्षा यांचा समावेश असणाऱ्या मूल्यमापनाला आकरिक म्हटले जाते. सर्व शाळांतील पहिल्या सत्रातील आकरिक, संकलित मूल्यमापन पूर्ण झाले आहे.

शिक्षकांना मूल्यमापनाच्या गुणांवर सरासरी गुण काढून सत्र दोनचा निकाल लवकर जाहीर करता येईल.

-आर. एस. पाटील, अध्यक्ष, सुर्योदय शिक्षण संस्था, शिरोली पुलाची.


साधारणत प्रथम आणि द्वितीय सत्रात आकरिक आणि संकरित मूल्यमापनानुसार निकाल जाहीर होतो. दुसऱ्या सत्रातील परीक्षा न झाल्याने आकरिक पर्याय योग्य आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या दैंनदिन नोंदी, अभ्यासातील प्रगती नोंदवली जाते. विषय अहवाल प्राप्त होतो. 

-एस. डी. लाड, जिल्हाध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT