Contribute to the livelihood unemployed
Contribute to the livelihood unemployed 
कोल्हापूर

साडेतीन हजार बेरोजगारांच्या रोजीरोटीला हातभार 

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : शहरातील विनाशिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत अन्नधान्याचे मोफत वाटप केले आहे. त्यामुळे रेशनकार्ड नसणाऱ्या 1 हजार 265 गरजू कुटुंबांना याचा लाभ झाला. रेशनकार्डापासून वंचित असणाऱ्या आणि लॉकडाउनच्या काळात रोजगार नसणाऱ्या 3 हजार 691 लाभार्थ्यांच्या रोजीरोटीला यामुळे हातभार लागला आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लॉकडाउन पुकारला. या कालावधीत अनेकांच्या रोजंदारीवर गदा आली. त्यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याने खायचे वांदे झाले होते. पैशाबरोबर अन्नधान्याची टंचाई भासू लागल्याने शासनाने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप केले. अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना नियमित धान्याबरोबर मोफत धान्य वाटप केले. अनेक महिने दूर राहिलेल्या केशरी कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ दिला; पण यातून विनाकार्डधारकांना फटका बसला. ही बाब लक्षात घेता अशा कार्डधारकांना अन्नधान्याचे वाटप सुरू केले. 

शहरातील विनाशिधापत्रिकाधारक कुटुंबांचा प्रभागानुसार सर्व्हे केला. नगरपालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये रेशनकार्ड असणाऱ्यांचाही यामध्ये समावेश असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सर्व्हेमधून नगरपालिकेने दिलेल्या यादीतील प्रत्येक विनाकार्डधारक लाभार्थ्यांचे शिधापत्रिकासह आधार लिंक आहे की नाही, याची सत्यता पडताळून पाहिली. पालिकेने दिलेल्या 2 हजार 228 कुटुंबांची फेरतपासणी केली. त्यातील 1 हजार 265 कुटुंबांना पात्र ठरवले. तसेच अशा कुटुंबातील 6 हजार 600 पैकी 3 हजार 691 लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती प्रतिमहा पाच किलो तांदूळ, एक किलो चना डाळीचे मे व जून महिन्यात मोफत वाटप केले. 

असे झाले वाटप 
* कुटुंबे - 1 हजार 265 
* लाभार्थी - 3 हजार 691 
* धान्य - 5 किलो तांदूळ, 1 किलो डाळ (प्रतिव्यक्ती) 
* कालावधी - माहे मे व जून 

ऑफलाईन धान्य... 
लाभार्थ्याचे आधारकार्ड कोणत्याही शिधापत्रिकेसोबत संलग्नित नसल्याची खातरजमा करून रास्त भाव दुकानातून त्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले. पुरवठा विभागाने अशांची स्वतंत्र नोंद घेऊन विनाशिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ऑफलाईन धान्य वितरित केले. शिधापत्रिका नसलेल्या यादीत त्यांची नोंद करून आधारकार्ड तपासून धान्याचा लाभ दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT