Corona Casepaper separate room in Government hospitals kolhapur marathi news 
कोल्हापूर

Sakal Impact : आता कोरोना केसपेपरसाठी स्वतंत्र कक्ष...

सुनील पाटील

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) कोरोनाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी आणि केसपेपर काढण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. जीवनाधार मेडिकल्सच्या समोर असणाऱ्या सीपीआरच्या इमारतीमध्येच हा कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे, अमेरिका, दुबई, इटली, चीनसह इतर देशांतून व जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या व्यक्तींची तपासणी व केसपेपर काढण्याचे काम या स्वतंत्र कक्षातच केले जाणार आहे. 


‘सकाळ’मधून ‘केस पेपर, तपासणीसाठी नाही स्वतंत्र कक्ष’ अशा मथळ्याखाली दिलेल्या वृत्ताची दखल घेत सीपीआर प्रशासनाने तत्काळ या कक्षात केसपेपर काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी उद्या दुपारपर्यंत मास्क, सुरक्षेसाठी सर्व आवश्‍यक साहित्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे सीपीआरच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. कोरोनाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या लोकांना तासन्‌ तास उभे केले जात होते. यामुळे परदेशातून एखादा कोरोना संसर्ग असणारा व्यक्ती याच रांगेत उभा राहिला तर त्याचा धोका इतरांना झाला असता.

जुन्या इमारतीमध्येच हा स्वतंत्र कक्ष

ज्यावेळी अर्धा ते एक तासानंतर केसपेपर काढण्यासाठी आपला पत्ता व कुठून आलेली माहिती सांगून कोरोनाची तपासणी करायची असल्याचे सांगतो, त्यावेळी त्या व्यक्तीच्या मागे रांगेत उभे असणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण होते. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’मधून आज प्रसिध्द झालेल्या वृत्ताची तातडीने दखल घेत सीपीआरच्या जुन्या इमारतीमध्येच हा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. 

कर्मचाऱ्यांची नियुक्ती हवी 
सीपीआरमध्ये सध्या पाच टेबलवर केसपेपर तयार केले जातात. त्यामुळे, कोरोना कक्षामध्ये केसपेपर काढण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी व तपासणी अधिकारी नियुक्त करावा लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT