corona effect on migrant sugarcane workers in belgum 
कोल्हापूर

पत्नीच्या अंगावरील दागिने विकले अन् कोयतो सोडून हातोडी घेतली...

अनिल पाटील

कोगनोळी (बेळगाव) - मूळगाव परभणी. श्रीकांत चव्हाण हे पत्नी मीना व मुलगा ओमकारला घेऊन दिवाळी दरम्यान ऊसतोडणी करण्यासाठी आले. सीमाभागात काहीकाळ ऊस तोडणी केली. पण अचानक मुकादम पळून गेल्याने हे काम बंद झाले. पोटासाठी काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. अखेर श्रीकांत यांचा पारंपारिक लोहार व्यवसाय कामी आला. त्यासाठी पत्नीच्या अंगावरील दागिने विकून साहित्य विकत घेतले. ऊस तोडणीचा कोयता सोडून पोटासाठी पोलादाला आकार मिळू लागला. पण आता त्यांना लॉक डाऊनचा चटका सहन करावा लागत आहे.

चव्हाण कुटुंबीयांनी सुरुवातीला महाराष्ट्रातील बाणगे, आनूर येथे काम सुरू केले. त्यातून उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटू लागला. पोटाची आग शमविण्यासाठी वेगवेगळ्या गावांचा प्रवास सुरू झाला.दिवसभर काम करून पती, पत्नी व मुलग्यास पाचशे ते सातशे रुपये मिळत. पण सध्या लॉक डाऊनमुळे रोज काम मिळेलच त्याची खात्री नाही. काम मिळेल त्या दिवशी दिवाळी अशी अवस्था आहे.

पोलाद देवून कुऱ्हाड तयार करण्यासाठी दोनशे रुपये, विळा दोनशे रुपये, खुरपे शंभर रुपये, कुदळ दोनशे रुपये अशी मजुरी ते घेतात. तर टिकाव, कुऱ्हाड व विळ्याला धार लावण्यासाठी पन्नास रुपये, खुरप्यास धार लावण्यासाठी तीस रुपये मजुरी आहे.

रस्त्यावरील संसाराला लोकांकडून मदत

राहण्यास ना घर, ना सावली. कोगनोळी येथील बिरदेव मंदिरासमोर झाडाखाली संसार सुरू आहे. समोरच लोहारकाम काम सुरू आहे. लॉक डाऊनच्या काळात आपल्या रस्त्यावरील रस्त्यावरील संसाराला लोक मदत करत असल्याचे चव्हाण दांपत्याने सांगितले.

'ऊस तोडणी मजूर म्हणून काम करण्यासाठी आलो. मात्र मुकादम पळून गेल्याने कामच बंद पडले. पोट भरण्यासाठी व्यवसाय सुरू केला. कसेतरी पोट भरण्याची व्यवस्था केली.
सध्या कोरोना संसर्गामुळे काम कमी आहे. दिवसाला शंभर रुपये मिळतात. यामध्ये दिवस काढत आहे.'
- श्रीकांत चव्हाण, कारागीर, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT