corona effect on transgender in nipani 
कोल्हापूर

टाळी नाय तर थाळी नाय...!

राजेंद्र हजारे

निपाणी - देशभरामध्ये दिवसेंदिवस 'कोरोना' चे संकट गडद होत चालले आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रशासन योग्य उपाययोजना करीत असले तरी ही रुग्णांची संख्या वाढली आहे त्यामुळे समाजातील सर्वच घटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. अद्यात ३ मे पर्यंत लॉकडाऊन परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे 'टाळी हेच जीवन' असलेल्या तृतीयपंथी समाजाची रोजी रोजी रोटी बंद झाली आहे. या काळात प्रशासन समाजातील विविध घटकाकडे लक्ष देत असले तरी या काळातही तृतीयपंथी मात्र दुर्लक्षितच राहिले असून त्यांनाही मदत करण्याची मागणी त्यांच्यातून होत आहे.

चिकोडी तालुक्यामध्ये दोन प्रकारचा तृतीयपंथी समाज आहे त्या केली एक समूह बाजारपेठ व इतर ठिकाणी फिरून आपला उदरनिर्वाह करतो.तर दुसरा समाज विवाह सोहळ्यात गोंधळ अथवा देवदेवतांच्या कार्यक्रमात रेणुका देवीची गाणी सादर करून उपजीविका करतो.पण लॉक डाऊनमुळे महिनाभरापासून संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने नागरिकांचा वावर रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे दररोज मिळणारे शंभर-दोनशे ही बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तर लॉकडाउनच्या काळात विवाह सोहळे आणि देवीच्या यात्रा-जत्राही पूर्णपणे ठप्प असल्याने गाणी सादर करून उपजीविका करणाऱ्या समाजासमोर ही आता बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कांबळे तृतीय पंथी समाजाचे मोठे हाल होत आहेत. प्रारंभीच्या काळात काही दानशूर व्यक्तींनी त्यांना अन्नाच्या स्वरूपात मदत केली.मात्र आता पुन्हा ३ मेपर्यंत लॉक डाऊन ची मदत वाढली आहे. शिवाय कोरोना विषाणूचे रुग्ण आटोक्यात न आल्यास पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी या समाजासमोर मोठे भीषण वास्तव उभे राहिले आहे.

दोन्ही समाजाचे चिक्कोडी तालुक्यामध्ये ७० पेक्षा अधिक व्यक्ती वास्तव्यास आहेत त्यापैकी बऱ्याच व्यक्तीकडे रेशन कार्ड किंवा आधार कार्डही नाही त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या त्याच्या पासूनही ते वंचित आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या मजूर व गरीब कुटुंबाप्रमाणेच त्यांची कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही त्यामुळे आयुष्यभर समाजाला दुवा देणाऱ्या तृतीयपंथी समाजाला कोरोनाच्या संकट काळात मदतीची गरज व्यक्त केली जात आहे. एकंदरीत अरुणा संसर्गाचा फटका तृतीयपंथी समाजालाही मोठ्या प्रमाणात बसत असून प्रशासनाने त्यांच्याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.
 

'कोरोना'चा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या लोक डाऊन चे आम्ही समर्थक व पालनही करीत आहोत मात्र ज्याप्रमाणे गरीब व गरजूंना शासन मदत करीत आहे त्याचप्रमाणे त्या संकटकाळात उपेक्षित असलेल्या तृतीयपंथी समाजालाही प्रशासनाने मदत करावी रेशन दुकानातून आम्हालाही अन्नधान्याचा पुरवठा व्हावा'.
- जितू, तृतीयपंथी नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT