in corona the entries for IIT course is increased various students choose this field and list of students declared on 5 sept 2020 in kolhapur 
कोल्हापूर

आयटीआयला प्रवेश घेतलाय ? तुमच्या प्रवेशाची यादी जाहीर होणार 'या' दिवशी

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) प्रवेश अर्ज भरण्याची मुदत काल संपली. राज्यात एकुण 3 लाख 24 हजार 863 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यावर्षी 1 लाख 45 हजार 45 हजार प्रवेशक्षमतेच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. परिणामी, शैक्षणिक क्षेत्रावर कोरोनाचे संकट असतानाही विद्यार्थ्यांनी आयटीआयला पसंती देत या अभ्यासक्रमाची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाततर्फे सुरू असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत येत्या शनिवारी गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल. प्रवेशासाठी एकूण पाच फेऱ्या होणार आहेत. यंदा एक ऑगस्टपासून ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने आयटीआय प्रवेश प्रक्रीया सुरू झाली. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे दोनदा प्रवेशअर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत नोकरीसाठी शॉटकट मानल्या जाणाऱ्या आयटीआयला विद्यार्थ्यांनी पसंती कायम ठेवली आहे. कच्ची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर होईल. यावर शुक्रवार अखेर हरकती घेता येतील. शनिवारी पक्की यादी प्रसिध्द होईल. राज्यात 417 शासकीय तर 569 खाजगी आयटीआय आहेत. यात एकूण 1 लाख 45 हजार 863 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. 

प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक 

- प्रवेश प्रक्रियेचा तपशील अंतिम दिनांक
- कच्ची गुणवत्ता यादी 3 सप्टेंबर
- गुणवत्ता यादी बाब 4 सप्टेंबर
- पक्की गुणवत्ता यादी 5 सप्टेंबर 
- पहिली प्रवेश यादी 8 सप्टेंबर
- पहिली यादीतील प्रवेशासाठी 9 ते 14 सप्टेंबर
- दुसरी फेरी विकल्प भरणे 9 ते 14 सप्टेंबर
- दुसरी प्रवेश यादी 17 सप्टेंबर
- दुसऱ्या यादीतील प्रवेशासाठी 18 ते 22 सप्टेंबर
- तिसऱ्या फेरीसाठी विकल्प विकल्प 18 ते 22 सप्टेंबर
- तिसरी यादी 25 सप्टेंबर
- तिसऱ्या यादीतील प्रवेशासाठी 26 ते 30 सप्टेंबर
- चौथ्या फेरीसाठी विकल्प 26 ते 30 सप्टेंबर
- चौथी यादी 5 ऑक्टोबर
- चौथ्या यादीतील प्रवेशासाठी 6 ते 9 आक्टोंबर 
- नव्याने अर्ज करण्यासाठी सधी 10 सप्टेंबर ते 5 आक्टोंबर
- एकत्रित गुणवत्ता यादी 11 आक्टोंबर 
- जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी फेरी 12 ते 18 ऑक्टोबर

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT