corona infection for wife and daughter who died pis become corona infection 
कोल्हापूर

दुर्दैव ; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीसह मुलीलाही कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या  त्या सहायक पोलिस निरीक्षकाच्या पत्नी व मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर अंधेरी येथे उपचार सुरू आहेत.

शनिवारी १५ मे रोजी कोरोनामुळे शाहूनगर पोलिस ठाणे(मुंबई) येथे कार्यरत असणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. ते घरीच असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलीची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्यांचाही  कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे. त्या दोघींना अंधेरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधीत अधिकार्याच्या संपर्कात आलेल्या पोलीस सहकारी व इतर लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्या अधिकाऱ्याचा मृत्यू, त्यानंतर त्यांच्या पत्नी व मुलीचा कोरोना पॉझिटिव्ह असलेला अहवाल यामुळे पोलीस प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. या शाहूनगर  पोलीस ठाण्यात आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात संबंधित अधिकाऱ्याचाही समावेश होता. त्यांच्या मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त होत आहे. या कोरोनच्या संकटातून त्यांच्या पत्नी व मुलीची लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT