corona infection for women in kolhapur 
कोल्हापूर

15 मिनिटे आली अन् हुरहुर लावून गेली...

सकाळ वृत्तसेवा

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : पुण्याहून आलेल्या येथील वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित वृद्धेसह कुटुंब पंधरा मिनिटासाठी घरात आले होते; मात्र ग्रामपंचायतीने त्यांची रवानगी संजय घोडावत विद्यापीठात संस्थात्मक विलगीकरण कक्षात केली. त्यामुळे शिरोलीकरांना धोका नाही; मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान उद्या (ता. 13) व रविवारी ( ता. 14) असे दोन दिवस शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय दक्षता समितीने घेतला. 

पॉझिटीव्ह वृद्धेसह पाच जणांचे कुटूंब 10 जूनला पुण्याहून आले होते. किणी टोल नाक्‍यावर पोलिसांनी कुटूंबाला संजय घोडावत विद्यापीठात संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्यास सांगितले ; मात्र त्यांनी थेट येथील घर गाठले. शेजाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार केली. पुण्याहून आल्याची माहिती मिळताच संस्थात्मक विलगीकरण कक्षात जावा, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला. यामुळे पंधरा मिनीटातच ते संजय घोडावत विद्यापीठातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात गेले. तेथे त्यांची तपासणी केली व वृद्धेचा स्वॅब घेतला. आज सकाळी वृद्धेचा अहावल पॉझिटीव्ह येताच नागरिक भयभीत झाले. पंधरा मिनिट घरी होतो; मात्र आमच्या संपर्कात कोणीही आले नसल्याचे कुटूंबाने सांगीतले. 

ग्रामपंचायतीने परिसर सील केला असून, औषध फवारणी केली आहे. आशा स्वयंसेवीकाच्यावतीने त्या परिसरातील नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. 

दरम्यान, सरपंच शशिकांत खवरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम दक्षता समितीची बैठक झाली. यामध्ये दोन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय झाला. आमदार राजूबाबा आवळे, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, सतिश पाटील, सरदार मुल्ला, बाजीराव सातपुते, जोतीराम पोर्लेकर आदी उपस्थित होते. 

शिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी पॉझिटिव्ह महिला संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता, दक्षता घ्यावी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. 
-शशिकांत खवरे, सरपंच 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण सत्ता कुणाची येणार? महायुतीला किती जागा? वाचा...

KDMC Election Result 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता? विजयी उमेदवारांची यादी समोर

Malegaon Municipal Result : मालेगावात भाजपाचा सुपडा साफ; पालिका हातातून गेली, इस्लाम पार्टीचा दणदणीत विजय, शिवसेनेला किती जागा?

Pune Municipal Results : पुण्यात मोठा राजकीय धक्का! प्रभाग 39 मध्ये गुंड बापू नायरचा पराभव, भाजपचा धडाकेबाज विजय

Nashik Election Result: नाशिकमध्ये माजी महापौर विरुद्ध माजी उपमहापौर रंगलेली लढत; अखेर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ?

SCROLL FOR NEXT