corona patient death registration is not in municipal corporation belgaum 
कोल्हापूर

काय आहे कोरोना बाधितांच्या मृत्यूचे गौडबंगाल....

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : कोरोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. जुलै महिन्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. पण बेळगाव शहरात सहा महिन्यातील सर्वात कमी मृत्यूची नोंद जुलै महिन्यात झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या मृत्यूचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

शहरात कोणाचाही मृत्यू झाला तर त्याची नोंद महापालिकेत होते, पण जुलै महिन्यात महापालिकेकडे केवळ 157 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. अंजुमन ए इस्लामचे अध्यक्ष राजू सेठ यांच्या माहितीनुसार, तेथील स्मशानभूमीत आठवडाभरातच शंभरहून अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र त्यातील सुमारे 60 जण कोरोनाबाधीत होते.

सदाशिवनगर व शहरासह अन्य स्मशानभूमीतही अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढले आहे. पण त्या मृतांची नोंद महापालिकेकडे झालेली नाही. महापालिकेच्या मते जिल्हा रूग्णालयात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची नोंद तेथेच केली जाते. एक वर्षानंतर ती माहिती महापालिकेकडे पाठविली जाते. त्यामुळे कोरोनाबाधीतांच्या मृत्यूची नोंद जिल्हा रूग्णालय अर्थात बिम्स येथेच झाली आहे. आता त्याची माहिती एक वर्षानंतरच महापालिकेला दिली जाणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात बेळगावातील मृत्यू दर घटला होता. 22 मार्चपासून पुढील एक महिना बेळगावात लॉकडाऊन होता. त्या काळात महापालिकेत सर्वात कमी मृत्यू नोंद झाली होती. महापालिकेतून मिळालेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात 274 जणांची मृत्यू नोंद तर एप्रिल महिन्यात 218 जणांची मृत्यू नोंद महापालिकेकडे झाली होती. मात्र मे महिन्यात मृत्यूची नोंद वाढली होती आणि पुन्हा जून महिन्यात कमी झाली होती. जून अखेरपर्यंत बेळगाव शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या कमी होती. मात्र पुन्हा जुलै महिन्यात ही संख्या वाढत गेली. आरोग्य विभागाच्या बुलेटीननुसार 2 ऑगस्ट पर्यंत कोरोनामुळे 75 जणांचा मृत्यू झाला आहे. पण प्रत्यक्षात मृतांची संख्या जास्त आहे. मात्र ही माहिती आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. 

मृतांवर महापालिकेच्या स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत. पण त्या मृत्यूची नोंद मात्र बिम्समध्ये केली जात आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची अधिकृत माहिती आरोग्य विभागाने महापालिकेला दिलेली नाही. त्यामुळेच प्रत्यक्षात बेळगावात मृत्यू जास्त झाले असले तरी महापालिकेकडे त्यांची नोंद कमी आहे.

जिल्हा रूग्णालय किंवा बिम्समध्ये मृत्यू झाल्यास त्याची नोंद तेथेच केली जाते. एक वर्षानंतर ती माहिती महापालिकेकडे पाठविली जाते. त्यामुळे महापालिकेकडे लागलीच त्याची नोंद होत नाही. 

डॉ. बसवराज धबाडी. आरोग्याधिकारी, महापालिका

गेल्या सात महिन्यातील महापालिकेकडील मृत्यू नोंद 
जानेवारी - 620 
फेब्रुवारी - 423 
मार्च - 274 
एप्रिल - 218 
मे - 417 
जून - 330 
जुलै - 157

संपादक - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT