corona patient found in belgium after twenty three days 
कोल्हापूर

बेळगात रेल्वे राज्यमंत्र्यांच्या निवास स्थानापासून जवळ सापडला कोरोनाचा रुग्ण...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - तब्बल २३ दिवसानंतर बेळगाव शहरात नवा कोरोना रुग्ण सापडला आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निवस्थानापासून जवळच कोरोना रुग्णाचे घर आहे. शहरात नवा हॉटस्पॉट तयार झाला आहे. शहरात कॅम्प येथे पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यांनतर आझमनगर, अमननगर व आझाद गल्ली येथे कोरोना रुग्ण सापडला होता. शहरातील हे चारही हॉट स्पॉट तातडीने सील डाउन करण्यात आले होते. या सर्व रुग्णांचे तबलिगी कनेक्शन चर्चेत होते.

ती महिला मुंबई येथील धारावी परिसरात वास्तव्यास

२१ एप्रिल रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातील आझाद गल्लीतील महिलेला कोरोना झाल्याचे उघडकीस आले त्यामुळे शहर हादरले. पण त्यानंतर गेल्या २३ दिवसात शहरात एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता सदाशिवनगर येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निवास स्थानापासून जवळच कोरोना बाधित महिलेचे वास्तव्य होते. अर्थात ही महिला मुंबई येथून आली असल्याने व ती सात महिन्यांची गरोदर असल्याने ती कुटुंबीय वगळता अन्य कोणाच्या संपर्कात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या महिलेच्या कुटुंबातील सर्वांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आहे. महापालिकेच्या वतीने तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तो परिसर सील डाउन केला जात आहे. ती महिला मुंबई येथील धारावी परिसरात वास्तव्यास होती अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे आता तबलिगी, अजमेर पाठोपाठ कोरोनाचे नवे मुंबई कनेक्शन समोर आले आहे.

या महिलेची आधीच आरोग्य तपासणी करण्यात आली होती, शिवाय ती गरोदर असल्यामुळे होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे केवळ प्रथम संपर्कातील म्हणजे कुटुंबातील सदस्यांनाच क्वारणटाईन करावे लागले आहे. सदाशिवनगर ही उच्चभ्रू वसाहत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये खळबळ माजली आहे. शहरातील कँप येथील निर्बंधित क्षेत्र रद्द करण्यात आले होते. त्यामुळे तीन निर्बंधित क्षेत्र शिल्लक होते. हे तिन्ही क्षेत्र रद्द करण्याच्या हालचाली सुरू असताना नवे निर्बंधित क्षेत्र तयार झाले आहे. या नव्या निर्बंधित क्षेत्राची घोषणा आज जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 squad: शुभमन गिलला संघातून का वगळले? अजित आगरकर, सूर्यकुमार यादव एक सूरात म्हणाले, संघहित...

Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

हिंजवडीला मी पुणे समजत नाही.... मराठी अभिनेत्रीचं बिनधास्त वक्तव्य चर्चेत, म्हणते- सॉरी पण मी...

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT