Corona positive patient 
कोल्हापूर

'ते' चोघे निघाले पॉझिटिव्ह अन् अधिकारी,कर्मचारी धास्तावले...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव शहरातील हॉटेल व वसतिगृहात विलगिकरण करण्यात आलेल्या चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे. यापैकी दोघे महाराष्ट्रातून आलेले आहेत. एकजण केरळ तर दुसरी व्यक्ती दिल्ली येथून आली आहे. बेळगाव शहरात प्रवेश केल्यानंतर ते सीपीएड मैदानावर गेले होते. तेथे नोंदणीवेळी महापालिका अधिकारी व कर्मचारी त्यांच्या संपर्कात आले होते. त्यांना ज्या हॉटेल व वसतिगृहात ठेवण्यात आले आहे तेथेही महापालिका अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तेथे भोजन व अल्पोपहार पुरविण्याची जबाबदारीही महापालिकेकडेच आहे. आतापर्यंत परराज्यातून आलेल्या बेळगाव शहरात संस्थात्मक विलगिकरण करण्यात आलेल्यापैकी कोणी पॉझिटिव्ह आले नव्हते. बुधवारी चोघे पॉझिटिव्ह आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी धास्तावले.

याआधी कोरोनाग्रस्तांच्या प्रथम व दुय्यम संपर्कातील लोकांना विलगिकरण करून ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या बाबतीत मोठी दक्षता घेण्यात आली होती. परराज्यातून आलेल्यांच्या बाबतीत फारसी दक्षता घेण्यात आली नव्हती. शिवाय त्यांचे स्वॅब विलंबाने घेण्यात आले. त्यामुळे त्यांचा विलगिकरणाचा कालावधी वाढला. परराज्यातून त्यातही सहा राज्यातून आलेल्याना विलगिकरण सक्तीचे आहे. पण त्यांचे स्वॅब न घेताच त्यांचे विलगिकरण केल्याने धोक्याची स्थिती निर्माण झाली होती. आता त्यांच्या स्वॅबचे अहवाल येण्यास सुरुवात झाल्यावर पॉझिटिव्ह चा धोका समोर आला आहे. कोरोनाची समस्या सुरू झाल्यानंतर बेळगाव शहरात पाहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यापासून महापालिका अधिकारी व कर्मचारी विलगिकरण प्रक्रियेत सहभागी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्यास सांगितले असले तरी विलगिकरण इमारतीमधील तसेच सिपीएड मैदानावरील त्यांचा वावर व कोरोना रुग्णांशी आलेला संपर्क यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकारामुळे महापालिका आयुक्त के एच जगदीश हेसुद्धा धास्तावल्याची माहिती महापालिकेतून मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT