corona treatment will be available in private hospital in belgaum district 
कोल्हापूर

बेळगाव जिल्ह्यातील 'या' 47 खाजगी रुग्णालयातही मिळणार कोरोनावर उपचार...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्‌या प्रमाणात वाढली तर रुग्णांसाठी बेडची कमरता पडु नये यासाठी आरोग्य खात्याने पावले उचलली आहेत. त्यानुसार बेळगाव जिल्हातील 9 तालुकास्तरीय सरकारी रुग्णालयात प्रत्येकी 50 बेड उपलब्ध सज्ज करण्यात आले आहेत. तसेच गरज पडल्यास मिलीट्री हॉस्पिटलमधील 150 बेडचा सहारा घेतला जाणार असुन येणाऱ्या काळात सरकारी रुग्णालयात रुग्ण संख्या वाढल्यास आयुष्यमान भारत व आरोग्य कर्नाटक कार्डचा लाभ देण्यासाठी नोंदणी केलेल्या बेळगाव जिल्हातील 47 खाजगी रुग्णालयात देखिल गरज पडल्यास उपचार केले जाणार आहेत.

बेळगाव जिल्हात सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात असली तरी राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे संभाव्य धोका ओळखुन बेळगाव जिल्हातील तालुका सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण ठेवण्यासाठी सज्जता केली जात असुन जिल्हा रुग्णालयासह जिल्हातील 9 तालुका आरोग्य केंद्रामधील 450 बेड जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर जिल्हातील 47 खाजगी रुग्णालयांमध्येही कोराना रुग्णांवर उपचार केले जाणार आहे.

कोरोना उपचारासाठी उपलब्ध असलेली खाजगी रुग्णालये

1 जे. जे. सहकारी हॉस्पिटल, घटप्रभा
2 विजया ऑर्थो हॉस्पिटल ,अयोध्या नगर,बेळगाव
3 बेळगाव चिल्ड्रन्स हॉस्पिटल, किर्लोस्कर रोड ,बेळगाव
4 यश हॉस्पिटल, महाद्वार रोड, बेळगाव
5 साईदीप आय हॉस्पिटल, सिविल हॉस्पिटल रोड,बेळगाव
6 कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, घटप्रभा
7 जयरत्न आय हॉस्पिटल, घटप्रभा
8 अजित नर्सिंग होम, रायबाग
9 श्री साई हॉस्पिटल ,वडगाव
10 आशीर्वाद नर्सिंग होम, अथणी
11 डॉक्‍टर बी बी घोडगेरी हॉस्पिटल, गोकाक
12 एस. फोर हॉस्पिटल, यरगट्टी
13 धन्वंतरी नर्सिंग होम ,, ऐनापुर
14 मल्लिकार्जुन हॉस्पिटल, हारुगेरी
15 पद्मा नर्सिंग होम,ऐनापुर
16 एस .बी. वडेयर स्मृती हॉस्पिटल हारुगेरी
17 डॉ. कपालगुद्धी नर्सिंग होम, गोकाक
18 मेत्री हॉस्पिटल, अथणी
19 श्री नर्सिंग होम, ऐनापुर
20 श्री अर्थ अँड ट्रॉमा सेंटर, कॉलेज रोड, बेळगाव
21 दक्षता हॉस्पिटल, टिळकवाडी बेळगाव
22 व्हिनस हॉस्पिटल, महात्मा फुले रोड, बेळगाव
23 गंगा हॉस्पिटल गोकाक
24 नोबल केअर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बेळगाव
25 अथर्व ऑर्थो अँड ट्रॉमा हॉस्पिटल, गोकाक
26 अन्नपूर्णा हॉस्पिटल, अथणी
27 आरोग्य आधार हॉस्पिटल, गोकाक
28 के.एल. ई प्रभाकर कोरे हॉस्पिटल, चिकोडी
29 के. एल. ई. हॉस्पिटल, गोकाक
30 जयरत्न हॉस्पिटल, गोकाक
31 डॉ. नवादगी हॉस्पिटल, सौंदत्ती
32 बी. एच. एस. लेक व्यू हॉस्पिटल, गांधीनगर बेळगाव
33 दानेश्वरी हॉस्पिटल, शहापूर बेळगाव
34 वेणूग्राम हॉस्पिटल, टिळकवाडी बेळगाव
35 नाईकवाडी मेडिकल सेंटर, हुक्केरी
36 राजीव गांधी रुरल हॉस्पिटल, यमकनमर्डी
37 जीवन हॉस्पिटल, मांजरी
38 लेक व्यू हार्ट हॉस्पिटल, महात्मा फुले रोड बेळगाव
39 विजया हॉस्पिटल, बेळगाव
40 सलगरे चिल्ड्रन हॉस्पिटल, सलगरे
41 कपिलेश्वर आर्थोपेडिक हॉस्पिटल, बेळगाव
42 डॉ.नाईक हॉस्पिटल, मुनवल्ली
43 के. एल. ई. एस. डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, नेहरूनगर, बेळगाव
44. के. एल. ई. शताब्दी हॉस्पिटल,येल्लुर रोड, बेळगाव
45 के .एल. ई.एस. कॅन्सर हॉस्पिटल, अशोक नगर बेळगाव
46 लाईफ केअर हॉस्पिटल, दरबार गल्ली बेळगाव
47 दानेश्वरी हॉस्पिटल ,माणिक नगर निपाणी

आयुषमान भारत, आरोग्य कार्ड असणाऱ्या रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार करुन घेता येणार आहे. मात्र सध्या तरी जिल्हा रुग्णालयामध्येच कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही कोरोना उपचारसाठी बेड तयार केले जात आहेत.
एस. यु. मुन्याळ, जिल्हा आरोग्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : जंगलातील गुन्हेगारांना पकडले जाते, पण ठेवायचे कुठे? कोल्हापूर वनसंरक्षणातील गंभीर उणीव उघड

शिव ठाकरेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याच्या घराला भीषण आग; थोडक्यात वाचला अभिनेता, व्हिडिओमधून दाखवली परिस्थिती

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपच्या महत्त्वाच्या बैठका सुरू

Numerology : उशिरा का होईना पण यशस्वी होतातच 'या' तारखेला जन्मलेले लोक...नशिबात असतो अधिकारी बनण्याचा योग

Hormone Balance Tips: हार्मोन संतुलित ठेवायचे आहेत? सायली शिंदेचे खास योग व जीवनशैली टिप्स; दैनंदिन जीवनात कसे अमलात आणायचे पाहा

SCROLL FOR NEXT