Corona two million eggs Three and a half million hens destroyed in aajra kolhapur marathi news 
कोल्हापूर

म्हणून त्याने साडेतीन लाख कोंबड्या गाडल्या आणि फोडली दोन लाख अंडी....

सकाळ वृत्तसेवा

आजरा (कोल्हापूर) : पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील अंकिता पोल्ट्री फिडस्‌ या फर्मचे मालक उत्तम रेडेकर यांनी साडेतीन लाख कोंबडीची पिल्ली जमिनीत पुरली, तर दोन लाख अंडी फोडली. त्यामुळे सुमारे दहा कोटींचे नुकसान झाले आहे. ‘कोरोना’मुळे पोल्ट्री उद्योगावर परिणाम झाला असून कोणताही पर्यायच समोर नसल्याने त्यांना हे कृत्य करावे लागले.

‘कोरोना’मुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. कोंबडी आणि अंड्यांचे भाव कोसळलेले आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योजक व फार्मधारक यांना मोठा फटका बसला आहे. सतत पडणारे भाव, न परवडणारे दर व पुरेसे खाद्य पदरात नसल्याने अंकिता पोल्ट्री फिडस्‌चे मालक श्री. रेडेकर यांनी साडेतीन लाख पक्षी जमिनीत पुरले. आर्थिक अडचणीमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात येते. त्यांचा मुलगा आकाश यांचे लिअर पक्ष्यांचे शेड आहेत. अंड्यांचा भाव दोन ते अडीच रुपयांवर आल्याने त्यांनी दोन लाख अंडी फोडून टाकली.

आर्थिक अडचणीमुळे घेतला निर्णय 

त्यांचे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. आजरा तालुक्‍यात सुमारे पाचशे पोल्ट्रीधारक आहेत. या पोल्ट्रीधारकांनी शेडमध्ये पक्षी भरण्याचे बंद केले आहे. त्यांचे इंटिग्रेशन हे अंकिता पोल्ट्री फिडशी होते. त्यामुळे तयार झालेली छोटी पिले द्यावयाची कोठे असा प्रश्‍न रेडेकर यांच्यासमोर होता. तयार झालेल्या कोंबड्याही ते वीस-पंचवीस रुपयांच्या भावाने आठवडा बाजारात विकत आहेत. आतापर्यंत अडीच लाख कोंबड्यांची विक्री झाली असून तीन लाख कोंबड्या शिल्लक आहेत. 

कडकनाथनंतर मोठा फटका
तालुक्‍यातील पोल्ट्री उद्योगाला कडकनाथमध्ये सव्वादोन कोटींचा फटका बसला. पन्नास उद्योजकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. ब्रॉयलर व लिअरमध्ये सुमारे पन्नास कोटींचा फटका बसला आहे. यामध्ये कसे सावरावयाचे या चिंतेत पोल्ट्रीधारक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT