corona virus effect on poultry farm kolhapur  
कोल्हापूर

कोंबडी जगवण्याचे आव्हान ; पोल्ट्री व्यावसायिकांसमोर खाद्याचा प्रश्न गंभीर 

सुयोग घाटगे

कोल्हापूर - पोल्ट्री मध्ये असणारी कोंबडी जगवण्याचे मोठे आव्हान सध्या पोल्ट्री व्यावसायिकांसमोर येऊन ठेपले आहे. पोल्ट्री मध्ये असणाऱ्या कोंबड्यांसाठी खाद्याची उपलब्धता नसल्यामुळे नेमकी पोल्ट्रीव्यवसाय चालवायचा कसा हा प्रश्न सध्या त्यांना भेडसावत आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये संचारबंदी लागू करण्यात अली आहे. या मुळे पोल्ट्री मध्ये असणाऱ्या कोंबड्याना खाद्य मिळत नसल्याचे चित्र आहे. शासनाने शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना लागणाऱ्या गोष्टींचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केल्यामुळे हि दुकाने खुली ठेवण्यात आली असली तरीही या कोंबड्यांसाठी येणारे खाद्य हे कर्नाटकातून येते.

शहरांतर्गत आणि राज्यांतर्गत काही अत्यावश्यक असणाऱ्या मालाची आवक सुरु असले तरीही राज्यांतर्गत होणारी वाहतूक हि संपूर्णतः बंद आहे. असे असल्यामुळे या कोंबड्याना लागणारे खाद्यच सध्या येणे थांबले असल्यामुळे पोल्ट्रीमध्ये असणाऱ्या हजारो कोंबड्या जगवायच्या कश्या हे समाजात नाही आहे. मुळात या कोंबड्यांना मिळणारे खाद्य हे प्रमाणित कंपनीकडून घ्यावे लागते. या खाद्या नुसारच कोंबड्यांची वाढ आणि त्यांचे वजन यावर परिणाम होत असतो. दिवसाला 2 हजार कोंबड्याना 25 किलो खाद्याची आवश्यक्यता असते. वय आणि वजन वाढेल तसे या प्रमाणामध्ये फरक होत असतो. शिवाय अधिकचे खाद्य साठवणूक करून ठेवणे हे लहान व्यवसायिकाला शक्य नसणारी गोष्ट आहे.  खाद्याच्या अभावी वाढ झालेल्या कोंबड्यांच्या वजनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. खाद्य कमी मिळत असल्यामुळे कोंबड्यांचे वजन कमी होत असून फायद्याचे उत्पन्न सोडाच मात्र गुंतवलेली मुद्दल देखील मिळवणे कठीण झाले आहे. 

कोरोनाच्या संसर्गाची देशामध्ये सुरवात झाल्यानंतर चिकन खाल्याने कोरोना होतो या अफवेमुळे अनेक व्यावसायिकांना हजारो रुपये खर्च करून पाळलेल्या कोंबड्या कवडीमोल भावाने तर अनेकांनी तर फुकट वाटून दिल्या. यामुळे हा व्यवसाय आणखीन संकटात सापडला आहे.                          

शेतीपूरक व्यवसायाला या संचार बंदीमधून सूट देण्यात असली तरीही या साठी लागणारे खाद्य हे कर्नाटक राज्यातून येते. यात सध्या राज्यांतर्गत सर्व सीमा बंद केल्यामुळे हे खाद्य येण्यास अडचणी येत आहेत. उपलब्ध असणाऱ्या खाद्याचा साठा देखील संपत आला आहे. अशामुळे पोल्ट्री मधील कोंबड्या जगवणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.   

 मुजावर - पोल्ट्री व्यावसायिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT