coronavirus effect on cloth business 
कोल्हापूर

...त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात मुलांना गणवेश मिळणे होईल कठीण 

संजय खूळ

इचलकरंजी - कोरोना संसर्गामुळे राज्यातील यंत्रमागाची चक्रे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात मुलांना नवे गणवेश मिळणार नाहीत. त्याचबरोबर लग्नाच्या जत्यातील अनेक कपड्यावरही परिणाम होणार आहे. यंत्रमाग व्यवसायाच्या दृष्टीने भरभराटीचा असलेला मार्च ते जून महिना यावर्षी कोरडाच जाणार असून त्याचा मोठा फटका उद्योजकांच्या वर बसणार आहे.
 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने यंत्रमाग व्यवसायातील चक्रे जवळपास एक महिन्याहून अधिक काळ ठप्प आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 10 लाखाहून अधिक यंत्रमाग आणि इचलकंजी परिसरातील दीड लाख यंत्रमागची चक्रे पूर्णपणे थांबली आहेत. शासनाने कालपासून उद्योगांना सवलती देण्याचा निर्णय घेतला असला तरी यंत्रमाग व्यवसाय हा अनेक घटकावर अवलंबून असल्याने तो सुरु होणे शक्यच नाही. जर सुरू झालाच तर जेमतेम आठ दिवस पुरेल इतकाच  कच्च्या मालाचा साठा या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या नंतर पुढे काय हे भवितव्य अधांतरीच आहे.

यंत्रमाग व्यवसायासाठी सुत हेच प्रमुख कच्चामाल आहे. विशेषता सूत दक्षिणेकडील राज्यात तयार होते. यामध्ये गुंटूर, कोईमत्तूर ,ईरोड या भागाचा समावेश आहे. या सर्वच भागात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असल्याने त्या ठिकाणी सुत निर्मिती कधी सुरू होईल याची शाश्वती नाही. त्याचबरोबर संसर्गाच्या दृष्टीनेही तिकडून येणारे सुत धोकादायक ठरणार आहे.

दुसऱ्या बाजूस तयार झालेले कापड देशातील विविध भागात जातो. त्यामध्ये पाली, बालोतरा, अहमदाबाद ,मुंबई, दिल्ली, कलकत्ता, जयपूर या प्रमुख बाजारपेठांचा समावेश असतो. या ठिकाणचे कापड बाजार पेठ पूर्णपणे ठप्प असून तेथील कापडावर प्रक्रिया होणारे प्रोसेस बंद आहेत त्यामुळे तयार झालेले कच्चे कापड या ठिकाणी पडून राहणार आहे. 

या सर्वाचा परिणाम यावर्षीच्या शालेय गणवेशावर होणार आहे. शालेय गणवेशासाठी लागणारे कापड साधारणपणे फेब्रुवारी मार्च पासूनच तयार होण्यास सुरुवात होते. मात्र याच कालावधीत यंत्रमाग बंद असल्याने त्याचे उत्पादन ठप्प झाले आहे. लग्नाच्या जत्यामध्ये लागणाऱ्या अनेक कापडाचे उत्पादन ही पूर्णपणे थांबले आहे. परिणामी यावर्षी अनेक शाळकरी मुलांना नवीन गणवेशला तर मुकावे लागणारच आहे. त्याचबरोबर लग्नाच्या जत्यातील काही कपड्याला ही बाजूला ठेवावी लागणार आहे.


शासनाने उद्योग सुरू करण्याबाबत काही सवलती दिल्या असल्या तरी यंत्रमाग व्यवसाय सुरू करणे अशक्यच आहे. मुळातच यापूर्वी दिलेल्या कापडाचे पैसे उत्पादकाला अजून आले नाहीत. अशा स्थितीत पुन्हा उत्पादन करणे यंत्रमाग धारकांच्या दृष्टीने धोक्याचेच आहे.
 -
-विनय महाजन, अध्यक्ष यंत्रमागधारक जागृती संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Address: विराट-अनुष्का यांचा लंडनमधील पत्ता सापडला? माजी इंग्लिश खेळाडूने दिली हिंट

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Latest Maharashtra News Updates : देवदर्शनाच्या रांगेत महिलेचे मंगळसूत्र लंपास

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

SCROLL FOR NEXT