coronavirus Government Medical College press conference in kolhapur marathi news 
कोल्हापूर

घाबरु नका कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग नाही...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘परदेशातून आलेल्या आणखी १३ जणांची आज सीपीआर रुग्णालयात कोरोनाची तपासणी झाली; मात्र कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. दोन दिवसांपूर्वी ज्यांचे थुंकीचे नमुणे तपासणीसाठी पाठविले होते त्यात सीपीआरच्या उच्चाधिकाऱ्यांसह तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,’ अशी माहिती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गझभिये यांनी पत्रकारांना दिली.

५६ जणांची सीपीआरमध्ये केली तपासणी

गेल्या काही महिन्यांत परदेशातून आलेले अनेक जण सीपीआरमध्ये तपासणीसाठी येत आहेत. यात इटली, जर्मनी, सौदे अरेबियातून आलेल्यापैकी शहर व जिल्ह्यातील एकूण ५६ जणांनी सीपीआरमध्ये तपासणी करून घेतली. तपासणीत गुरुवारपर्यंत तिघांचे थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तपासणी केलेल्या बहुतेकांना खबरदारी कशी घ्यावी, याच्या सूचना देऊन घरी पाठवले आहे. तसेच किमान १४ ते १५ दिवस घरातून बाहेर न पडण्याची सूचना केली आहे. याशिवाय वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असेही डॉ. गझभिये यांनी सांगितले.

उच्चाधिकाऱ्यास कोरोना लक्षणे नाहीत 
सीपीआरमधील उच्चाधिकाऱ्याची कोरोना तपासणीसाठी स्वॅप नमुना राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे पाठविल्याची चर्चा आहे, याबाबत नेमकी काय स्थिती आहे? असे डॉ. गझभिये यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘माझीच प्रकृती बरी नाही, अनेकांशी सतत बोलावे लागते. बाहेरून आलेल्या व्यक्तींशी संवाद होतो, त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून स्वॅप तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल आजच प्राप्त झाला. तो निगेटिव्ह आहे, तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. हेही स्पष्ट झाले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT