coronavirus impact attempts to oust the family in kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोरोनाची धास्ती : तो दुबईहून आला आणि सोसायटीने केले हे.....वाचा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : तुमच्या घरात कोरोनाचा रुग्ण आहे. तुम्ही सोसायटी सोडून बाहेर राहा, असे म्हणत रमणमळा परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये एका कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी दबाव आणल्याचा प्रकार आज घडला. दरम्यान, संबंधित व्यक्तीची कोरोना तपासणीची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर गृहनिर्माणमधील सदस्यांनी मवाळ भूमिका घेतली. 

रमणमळ्यात कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न
रमणमळा परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये रहिवासी असणाऱ्या एका कुटुंबातील सदस्य सकाळी दुबईहून परत आला. दरम्यान, ही व्यक्ती सोसायटीमध्ये आल्याचे इतर सदस्यांना व रहिवाशांना कळले. त्यानंतर कोरोनाच्या भीतीने दुबईहून आलेल्या व्यक्तीसह त्यांच्या कुटूंबियांना तिथून बाहेर जाण्यास सांगू लागले. दरम्यान, ही माहिती एका फ्लॅटधारकाने तहसीलदार कार्यालयाला सांगितली. तर, त्याच वेळी तेथील कुटुंबियांनी संबंधित कुटुंबातील सोसायटीतून बाहेर जाण्यास दबाव टाकू लागले.

दुबईहून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित नाही

हा प्रकार समजताच दुपारी कसबा बावडा तलाठी कार्यालयातील एक कर्मचारी या ठिकाणी पोचले. त्या कर्मचाऱ्याने संबंधित कुटूंबियांची भेट घेतली. याचवेळी त्या व्यक्तीचा भाऊ आणि ते सीपीआरमध्ये कोरोनाची तपासणी करण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गृहनिर्माण संस्थेतील लोकांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला. 

 हेही वाचा-दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव नाहीतर.....
बहिष्कार नको 
पुण्यात कोरोनाग्रस्तावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काही कुटुंबांनी घेतला होता. त्यानंतर आता असाच प्रकार कोल्हापुरात घडू नये यासाठी  जिल्हा प्रशासनाने दक्षता घेतली आहे. दरम्यान, गरज असल्यास अशा कुटुंबियांना पोलीस प्रशासनाने सुरक्षा द्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT