coronavirus impact Disaster Management Act applies in Kolhapur marathi news 
कोल्हापूर

ब्रेकिंग कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती घोषित : यात्रा,समारंभाना बंदी...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात  (ता. १४) मंगळवार (ता. ३१ मार्च) पर्यंत यात्रा, ऊरूस, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, सार्वजनिक समारंभ, सभा, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. दरम्यान, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत पुजारी किंवा धर्मगुरू आदींना विधिवत पूजा करण्यास किंवा परंपरेने करायचे कार्यक्रम मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नसल्याचेही देसाई यांनी नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘‘कोरोना विषाणू एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होतो. त्यामुळे जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धांवर १४ ते ३१ मार्चपर्यंत बंदी घातली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात प्रवास करीत आहेत. असे प्रवासी जिल्ह्यामध्येही परदेश प्रवास करुन आलेले आहेत व बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्ह्यात यात्रा, उरुसांना बंदी

कोरोना विषाणूचे संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्यची शक्‍यता लक्षात घेता तत्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यास अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणेसाठी हा निर्णय घेतला आहे. परदेशी प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य टाळले पाहिजे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम लागू केले आहे.’’

घरगुती कार्यक्रम परवानगीने
घरगुती पद्धतीने एखादा कार्यक्रम करायचा असेल तर तहसीलदार, मुख्याधिकारी, नगरपालिका किंवा महापालिका आयुक्तांकडून कार्यक्रमांसाठी लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. शासकीय यंत्रणांनी अशाप्रकारे सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धेच्या आयोजनासंदर्भात परवानगी दिली जाऊ नये, असेही आदेश देसाई यांनी दिले आहेत. 

सोमवारची बैठक रद्द
जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (ता. १६) मुंबईत आढावा बैठक घेणार होते. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
तहसीलदार, मुख्याधिकारी किंवा आयुक्ताच्या आदेशाचे उल्लंघन करून गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संयोजकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ अन्वये महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये तत्काळ कारवाई करावी. यासाठी तहसीलदार, मुख्याधिकारी व आयुक्तांना प्राधिकृत करण्याचे आदेश देसाई यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT