couples graduated at the same time 
कोल्हापूर

संधी शोधली, कपल्सनी मिळवली एकाच वेळी पदवी 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात प्रत्येकाने वेगवेगळ्या संधी शोधल्या आणि याच काळात येथील काही शिक्षक व संशोधकांनी विविध विषयांवर संशोधन करीत "पीएचडी' पदवीही मिळवल्या. विशेष म्हणजे त्यात पती व पत्नी अशा दोघांनी एकाच वेळी पदवी मिळवणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे, त्यांनी "लोकल टू ग्लोबल' विषयावर यानिमित्ताने संशोधन केले आहे. 

भुयेवाडी (ता. करवीर) येथील प्रा. अभिजित पाटील विवेकानंद महाविद्यालयात, तर त्यांच्या पत्नी प्रा. योगिता पाटील गोखले महाविद्यालयात कार्यरत आहेत. दोघे पती-पत्नी मुळातच डबल पोस्ट ग्रॅज्युएट आणि भूशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय. दगड-धोंड्यात रमणारे हे दांपत्य. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) येथे एकाच दिवशी "पीएचडी'साठी त्यांनी नोंदणी केली. अभिजित यांनी कुंभी नदीच्या खोऱ्यातील तर योगीता यांनी कासारी नदीच्या खोऱ्यातील भूशास्त्रीय अभ्यासावर संशोधन केले आणि भुयेवाडी पंचक्रोशीत "पीएचडी' मिळवणारे ते एकमेव दांपत्य ठरले. 

कसबा बावडा येथील त्र्यंबोलीनगरात राहणारे रोहित सुरतेकर सध्या पोलंडमध्ये आहेत. गेल्याच जूनमध्ये त्यांचा विवाह झाला, त्यांच्या पत्नी पृथा घोष कोलकता येथील आहेत. दोघांनीही "एनसीबीएस-टीआयएफआर' या बंगळूरमधील संस्थेतून जीवशास्त्रामधील "पीएचडी' पूर्ण केली आहे. सध्या दोघेही वॉर्साव-पोलंड मधील "आयआयएमसीबी' या युरोपियन संशोधन संस्थेत पोस्टडॉक्‍टोरल फेलो म्हणून कार्यरत आहेत. या नवविवाहित दाम्पत्याने कोरोनाच्या काळातही संशोधन चालू ठेवले आहे.

पृथा या तर एका आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीममध्ये सहभागी होत्या. ज्यांनी सार्स-कोविडच्या जीनोमचे थ्रीडी मॉडेल बनवले आहे. अशा मॉडेल्समधून विषाणूच्या जिनोमवरील बारकावे कळतात आणि त्याचा उपयोग संसर्गविरोधी उपचारात्मक औषधे बनवण्यासाठी होतो, असे रोहित यांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा... 
एकीकडे रोहित व पृथा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. त्याचवेळी पाटील दांपत्याने मात्र आपल्याच मातीतील संशोधनावर भर दिला आहे. अभिजित यांचे वडील (कै.) जयसिंगराव पाटील भुयेवाडी गावचे 35 वर्षे सरपंच होते. शेतातच आजवरचे आयुष्य गेल्याने त्यांनी आपल्याच भागातील दगड-धोंड्यांचा अर्थात धरणीमातेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. योगायोगाने त्यांच्या पत्नींचाही याच विषयात विशेष आवड आहे. त्यापूर्वी कोयना धरणक्षेत्रात सहायक भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT